You are currently viewing वटवृक्ष

वटवृक्ष

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वटवृक्ष*

 

दिसतो जसा तपस्वी

मुनीसारखा ध्यानस्थ

पारंब्या लांब लोंबती

सावलीस जमती पांथस्थ…

 

छत्र मायपित्यांचे

वटवृक्षात भासते

गोंधळल्या मनास

स्थितप्रज्ञता शिकवते…

 

किती सुंदर हा पादप

हिरवा दाट पर्णभार

मुळे त्याची खोलवर

सांगती जणू रहा जमिनीवर…

 

पक्षी पाखरे प्रवासी

विसावती विश्वासे

सत्यवान सावित्रीची

कथा ऐकतसे…

 

आधार वटवृक्षाचा

सांभाळी संतुलन

विश्व पर्यावरणाचे

ठेवतसे बांधून…

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा