*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री उज्वला कोल्हे लिखित अप्रतिम अष्टाक्षरी काव्यरचना*
*वटपौर्णिमा…*
जेष्ठ महिना पौर्णिमा
सण हा सुवासिनींचा
करी व्रत उपवास
भारतीय संस्कृतीचा
राहो अखंड सोभाग्य
दीर्घायुष्यी होवो पती
लाभो सात जन्म वर
वड सवाष्णी पुजती
सावित्रीचे पुण्य थोर
वाचविण्या सत्यवान
दान मागते यमास
मिळविण्या पुन्हा प्राण
फे-या मारुनी वडास
दोरा गुंडाळती त्यासी
कुंकू हळद लावुनी
करी उपवास खासी
यश आरोग्य समृद्धी
आज मागे देवाकडे
वसा रुढींचा जपुनी
कल हा विज्ञानाकडे
जाणू महती वृक्षाची
नका तोडू त्याची फांदी
लावू एक वटवृक्ष
रूजू संकल्पाची नांदी
………..✍
👉उज्ज्वला कोल्हे,uk
कोपरगाव