You are currently viewing स्मृति भाग ७२

स्मृति भाग ७२

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य ज्येष्ठ लेखक कवी भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

*स्मृति भाग ७२*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज नारळी पौर्णिमा , रक्षाबंधन . विवाहविधी संपून आज गृहस्थाश्रमाच्या बंधनांचा मागोवा घ्यायचा आहे .

नवरानवरीचे लग्न लावतांना बहुतेक ब्राह्मण , कुणी सुरात कुणी बेसुरात ! कसे का म्हणेना पण म्हणतात— *” धन्यो गृहस्थाश्रमः”* . आज आपल्याला त्याच गृहस्थाश्रमाचा गौतम ऋषिंनी केलेला विचार पहावयाचा आहे . चला तर पाहूच .

गृहस्थ देव , पितर , मनुष्य , भूत आणि ऋषि यांची पूजा व नित्य स्वाध्याय करणारा असला पाहिजे , हे मत त्यांनी दुसर्‍याच वचनात मांडले आहे .

 

*उपासनेला दृढ चालवावे ।*

*भूदेव संतासि सदा नमावे ।*

*सत्कर्मयोगे वय घालवावे ।*

*सर्वामुखी मंगल बोलवावे ।।*

हा खरा स्वाध्याय आहे . पुन्हा पुन्हा वाचा या चार ओळी . समस्त स्वाध्यायींचे हृदयस्थ प.पू. पांडुरंग शास्त्री आठवलेंनी म्हणजे दादांनी स्वाध्यायाची सुरवात केली व आजन्म व्रती राहिले . आज आगरी , वाघरी , कोकणी , मावची , डांगी , भिल्ल , पावरा इ. आदिवासी जमाती ही श्री आद्य शंकराचार्यांची स्तोत्रे गातांना दिसतात ! हा स्वाध्याय . पैसा देवच देतो यावर विश्वास न ठेवता पूजापश्चात पैशाच्या आशेवर जगणारे ब्राह्मणसुध्दा अशा स्वाध्यायास समजू शकले नाहीत !!!! इतर भारतीयांची काय कथा !!!

स्वस्तिवाचन व भिक्षादान मागितल्याशिवाय करु नाही . अब्राह्मण —ब्राह्मण—श्रोत्रिय व वेदपारग यांस दिलेले दान क्रमाने सामान्य—दहापट—हजारपट—अनन्त फळ देते , असे सांगितले आहे . त्या आगोदर रोज यज्ञ करावे , हे ही सांगितले आहे .

गुरु , विवाह व औषधि , यज्ञ करण्याची इच्छा ठेवणारे , वृत्तीने क्षीण , अध्येता , यात्रा करणारे , विश्वजित् यज्ञ करणार्‍यास धन वाटावे वा द्यावे . अन्य मागणार्‍यांस वेदी बाहेरील शिजवलेले अन्न द्यावे . *प्रतिज्ञा करुन ही अधर्माने युक्त मनुष्यास धन दान करु नये .* म्हणजे अधर्मी माणसास देण्याची वेळ आली तर प्रतिज्ञाच मोडावी !! केवढा सूक्ष्म संकेत !! (प्रतिज्ञा न मोडणारे भीष्म व प्रतिज्ञा मोडणारा श्रीकृष्ण !!! फरक कसा असतो ना !!!!!!! ). अधर्मी वा धर्मनिरपेक्षांचे हातात भारत स्वतंत्र झाल्यावर धन गेल्याने आज भारताची झालेली अवस्था आपण पहातच आहोत .

गृहस्थाने आपण स्वतः भोजन करण्या आगोदर प्रथम अतिथी , कुमार , रोगी , गर्भवती स्त्रिया , सुवासिनी , म्हातारे व अति लहान मुले यांस प्रथम भोजन द्यावे . ही प्रथा आजही आमच्या खान्देशातील कोकणी समाजातील विवाहात ७०% सुरु असलेली आपणास पहावयास मिळेल . ही अभिमानाची गोष्टच आहे ना !!!

अश्रोत्रिय ब्राह्मणास आसन , जल द्यावे व श्रोत्रिय ब्राह्मणास त्यासह अन्न ही द्यावे . वैद्य व उत्तम आचरण करणार्‍यास आपल्या घरी बनलेले उत्तम अन्न द्यावे . अनुत्तमास स्वागत म्हणून स्थान व जल द्यावे . पूज्य जनांचे आगोदर खावू नये. समान आणि श्रेष्ठांची समान रुपाने सेवा करावी . अतिथी व शूद्रासही आरोग्य व क्षेम कुशल विचारावे . यज्ञयागात ब्राह्मण व अब्राह्मणांनी वेगळे जेवावे .

बहुतांश सूचना वाचनीय व आचरणीयच आहेत . उद्या गृहस्थाश्रम कर्तव्य पाहू .

सुंदर आहेत ना स्मृति ? तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा