*जेष्ठ साहित्यिका, उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हायी आसचं राहो !*
बारा महिना नदीमातून
पानी वाहत राहो
बारा महिना झुयझुयवानी
गानं गुंजत राहो
शेतमया हिरवा राहोत
झाडे बहारदार
गुरे ढोरे आनंदमा
पक्षी मजामा
झाडे येलीसले झोका देत
वाहत राहो वारा
आभायमा ढग येवोत
बरसत येवोत धारा
हाइ आसचं राहो म्हनीसन
आपण कायजी लेवू
जठे जठे आसीन माटी
तठे झाड लावू
अनुपमा जाधव, डहाणू