*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री डॉ. दक्षा पंडित लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वटपौर्णिमा*
वटपौर्णिमेची कथा
सावित्री सत्यवानाची
पतिचे प्राण रक्षिण्या
महान अश्या व्रताची…..१
पती म्हणूनी निवडे
सावित्री सत्यवानास
अल्पायुषी असूनही
लग्नाचे केले धाडस……२
कठीण तप:श्चर्येने
यमदेव हाई प्रसन्न
तीन वर मागूनिया
मिळवी मान सन्मान…..३
जेष्ठातल्या पौर्णिमेस
वटपौर्णिमेचा सण
वडाची पूजा करुनी
दीर्घायूची मागे आण……४
वटपौर्णिमेच्या दिनी
वट वृक्षाचे पूजन
ताेडू नका फांद्याना
करू वृक्ष संवर्धन…….५
भारतीय संस्कृतीत
वृक्ष महत्व महान
ठेवूनिया कृतज्ञता
करू तयांचा सन्मान……६
दीर्घआयू वडाचे हे
प्रतिकात्मक पूजन
माऊली सम वृक्षास
करू आपण वंदन…….७
डॉ दक्षा पंडित
दादर,मुंबई