You are currently viewing पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन या माध्यमातुन खोटले, हेदुळ, वायंगवडे, ओरोस या शाळेंमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन या माध्यमातुन खोटले, हेदुळ, वायंगवडे, ओरोस या शाळेंमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन या माध्यमातुन खोटले, हेदुळ, वायंगवडे, ओरोस या शाळेंमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

कुडाळ

पर्यावरणाचे संवर्धन व संगोपन या माध्यमातुन झाडे लावा झाडे जगवा हा स्तुत्य उपक्रम खोटले, हेदुळ, वायंगवडे त्याचप्रमाणे ओरोस (देऊळवाडा शाळा) या ठिकाणी काही झाडे देवुन व वृक्षारोपण करुन कार्यक्रम घेण्यात आला.
वात्सल्य सामाजिक संस्था व जागरुक नागरीक सेवा संघ ओरोस तसेच पंचशिल ट्रस्ट ओरोस आदर्शनगर यांच्या संयुक्त विद्यमाने झाडे लावा झाडे जगवा हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाला सौ. नेहा परब, (वात्सल्य सामाजिक संस्था अध्यक्ष) व जागरुक नागरीक सेवा संघाचे अध्यक्ष श्री. अरविंद सावंत तसेच त्यांचे सहकारी सचिव श्री. शंकर भोगले व पंचशिल ट्रस्ट अध्यक्ष श्री. संजय खोटलेकर व त्यांची टीम त्याप्रमाणे कु. संविधान खोटलेकर हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात खोटले शाळा नं. १ येथे करण्यात आली. पहिलीचा पहिला प्रवेश यामध्ये गौरेश परब या मुलाचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. अरविंद सावंत यांनी स्विकारले होते. खोटले गावचे सरपंच, उपसरपंच त्याचप्रमाणे ग्रामस्थ श्री. गोविंद तावडे त्याचप्रमाणे श्री. संजय खोटलेकर व सौ. नेहा परब तसेच केंद्र प्रमुख गावीत सर, मुख्याध्यापिका सौ. आंगणे मॅडम, माईणकर सर, जाधव मॅडम व इतर गामस्थही उपस्थित होते. वायंगवडे शाळा नं. १ येथे सुध्दा झाडे लावण्याचा उपक्रम करण्यात आला त्यावेळी मुख्याध्यापिका परग मॅडम व त्यांचे सहकारी उपस्थित होते. तसेच हेदुळ शाळा नं. १ या शाळेचे श्री. सावंत सर, मेस्री सर व इतर सहकारी उपस्थित होते. प्राथमिक शाळा नं. १ ओरोस बुद्रुक येथेही या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या वेळी या शाळेची मुख्याध्यापिका सौ. स्मिता गवस मॅडम व रिया आळवेकर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
या कार्यक्रमानिमित्त संवर्धन व संगोपन या माध्यमातुन झाडे लावा झाडे जगवा हा स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्वांनी गौरवोद्गार काढले. झाडे लावणे व झाडे जगवणे हे आज अत्यंत गरजेचे आहे असे विचार केंद्र प्रमुख श्री. गावीत सर यांनी काढले. याच कार्यक्रमात कु. संविधान खोटलेकर यांचा ११ वा वाढदिवस सर्व मुलांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी श्री. थोरात सर यांनी सुध्दा या कार्यक्रमाला सौ. नेहा परब, श्री. अरविंद सावंत, श्री. शंकर भोगले यांनी या कार्यक्रमाला भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आपणाला ध्येय गाठायचं असेल तर प्रयत्नवादी असले पाहीजे. वाचन, लिखाण मोठया प्रमाणात करा व आपणाला मोठेपणी कोण व्हायचे आहे ते आजच ठरवुन घ्या अशा आशयाचे विचार या प्रसंगी श्री खोटलेकर यांनी मांडले. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन श्री. माईणकर सर यांनी केलं.

*संवाद मीडिया*

👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓👨🏻‍🎓🧑🏻‍🎓

*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*

*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*

*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त

*🧑🏻‍🎓👨🏻‍🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻‍🎓🧑🏻‍🎓*

*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे

*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*

🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.

*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*

*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*

*📱संपर्क क्रमांक :*

*7057421082*
*9028466701*
*9420156771*

✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

छायाचित्रात वृक्ष लागवड करताना तिनही संस्थेचे कार्यकर्ते, शिक्षकवर्ग त्याचप्रमाणे प्रशालेतील विद्यार्थीवर्ग.

प्रतिक्रिया व्यक्त करा