You are currently viewing मृगाने

मृगाने

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*मृगाने*

 

भुजंगप्रयात

 

किती हाल विरही करावे मृगाने

प्रियेच्या स्मृतींशी छळावे मृगाने

 

सरीनी भिजावे तिला आठवावे

उसासे, शहारे, झुरावे मृगाने

 

असा पावसाळा नकोसा नकोसा

तरीही ऋतुंशी सजावे मृगाने

 

दिलासा मिळावा सरी झेलताना

असे अंतरंगी शिरावे मृगाने

 

पुन्हा जागवावी मनाची खुमारी

पुन्हा हे तराणे फुलावे मृगाने

 

श्रीनिवास गडकरी.

9130861304

रोहा पेणं पुणे

केवळ नावासहितच पुढे पाठवावे

@ सर्व हक्क सुरक्षित

प्रतिक्रिया व्यक्त करा