कणकवली :
रविवार दिनांक 23 जून 2024 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता श्री चेस अकॅडमी, कणकवली आयोजित एकदिवसीय सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा 2024 समर्थ मंगल कार्यालय (दुर्गाराम हॉल), रेल्वे स्टेशनजवळ, नरडवे रोड, कनकनगर, कणकवली येथे घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी मुख्य पारितोषिक पहिले बक्षीस रुपये 1000/- व चषक, दुसरे बक्षीस रुपये 750/- व चषक, तिसरे ते पाचवे बक्षीस रुपये 500/- व चषक तसेच इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी अंतिम तारीख दिनांक 22 जून 2024 असून स्पर्धा फ्री रुपये 200 रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच स्पॉट एन्ट्री घेतली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. प्रथम येणाऱ्या 100 स्पर्धकांना संधी दिली जाणार आहे. तसेच स्पर्धा नाव नोंदणी साठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/Cvc7dTlpki9DWp6z0f5OB8
स्पर्धेकरिता मर्यादित गट खालील प्रमाणे :
1) 18 वर्षाखालील क्रमांक 1 l ते 5 मेडल
2) 15 वर्षाखालील क्रमांक 1 ते 5 मेडल
3) 12 वर्षाखालील क्रमांक 1 ते 5 मेडल
4) 9 वर्षाखालील 1 ते 5 मेडल
*स्पर्धेसाठी नियम व अटी:*
1) स्पर्धा स्वीस लीग पद्धतीने खेळवली जाईल.
2) प्रत्येक फेरी 30 मिनिटे राहील 3) एकूण फेऱ्या खेळाडूंची संख्येवर ठरविल्या जातील
4) स्पर्धा ठीक साडेनऊ वाजता चालू होणार आहे
5) स्पर्धा एकत्रित खेळविण्यात येईल
6) स्पर्धा फिडेच्या चालू नियमानुसार खेळवली जाईल
7) 18 वर्षाखालील मुलांना प्रवेश (1 जानेवारी 2006 नंतर जन्म)
8) शाळेचे ओळखपत्र आधार कार्ड सोबत घेऊन यावे.
स्पर्धा फी साठी Gpay, PhonePe क्रमांक 9422381949 या नंबरवर करा. तसेच अधिक माहितीसाठी श्रीकृष्ण आडेलकर 9405928919 संपर्क साधावा.