स्थानिकांना नोकरीसाठी प्राधान्य द्या
चिपी
राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपजिल्हाध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी चिपी विमानतळाला भेट दिली. स्थानिकांना नोकरी मध्ये प्राधान्य द्यावे यासाठी युवक चे उपजिल्हा अध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी निवेदन दिले.
निवेदना मध्ये त्यानी नमूद केले कि, प्राधान्याने स्थानिक लोकांनाच इथे संधी दिली पाहिजे. याबाबत त्यांनी विमानतळ व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली, की स्थानिक जिल्ह्यातील उमेदवार यांनाच नोकरीसाठी संधी मिळाली पाहिजे तसेच बाहेरील उमेदवारांना इथे नोकरीसाठी संधी नाही दिली पाहिजे. व्यवस्थापक श्री.पाटील यांनी स्थानिक उमेदवार यांनाच इथे आम्ही संधी देऊ असा शब्द यावेळी त्यांना दिला. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर तसेच नोकरीसाठी उमेदवार सुभाष गावडे, दुर्वेश गावडे, शुभम गावडे, विनायक लाड उपस्थित होते.