You are currently viewing प्रशासन अधिकारी यांनी औक्षण करून केले विद्यार्थांचे स्वागत

प्रशासन अधिकारी यांनी औक्षण करून केले विद्यार्थांचे स्वागत

*प्रशासन अधिकारी यांनी औक्षण करून केले विद्यार्थांचे स्वागत*

पिंपरी

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या इंद्रायणीनगर, भोसरी येथील पी. सी. एम. सी. पब्लिक स्कूलच्या श्री वैष्णोमाता प्राथमिक विद्यामंदिर येथे मंगळवार, दिनांक १८ जून २०२४ रोजी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांच्या हस्ते विधिवत औक्षण करून तसेच खाऊ भरवून ढोल – लेजीमच्या गजरात चिमुकल्या विद्यार्थ्यांचे दणदणीत स्वागत करण्यात आले. पिंपरी विभाग समन्वयक संतोष जाधव, पर्यवेक्षिका सुनंदा मगर, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, रवी लांडगे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, सामाजिक कार्यकर्ते योगेश लोंढे, शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष पवित्रा भद्रशेट्टी, मुख्याध्यापिका वंदना इन्नाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नूतनीकरण करण्यात आलेल्या बाला वर्ग खोल्या, स्वतंत्र संगणक कक्ष, विज्ञान प्रयोग शाळा, ग्रंथालय यांचे उद्घाटन करण्यात आले. वंदना इन्नाणी यांनी प्रास्ताविकातून, “एक काळ असा होता की, आपला पाल्य कितवीत आहे हे पालकांना माहीत नसायचे; पण आज मुलांचे ज्या प्रकारे स्वागत झाले, ते त्यांच्यासाठी चिरस्मरणीय आहे. वीस वर्षांपूर्वी एका घरगुती बालवाडीपासून या शाळेचा झालेला प्रारंभ आज सुमारे ९०० विद्यार्थी पटसंख्येपर्यंत जाऊन पोहचला आहे. प्रशासनाकडून शाळेची सुसज्ज इमारत व्हावी हीच कळकळीची मागणी आहे. शाळेच्या या प्रगतीमध्ये सर्व शिक्षकवृंदाचे मोलाचे योगदान आहे!” अशी माहिती दिली.

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ओळखपत्र आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यावेळी वर्गशिक्षिका सारिका कानडे आणि मार्गदर्शक प्रदीप बोडखे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या संयोजनात शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुरेश धायरकर यांनी सूत्रसंचालन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा