*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीता अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”स्वातंत्र्य स्फूर्ती देवतेला वंदन”*
स्वातंत्र्याच्या स्फूर्ती देवतेला करू वंदन
राज्ञी लक्ष्मी वीरांगिणी आहे ऊर्जा स्थानIIधृII
माता पिता छत्र हरपले बालवयांत
शिके घोडे स्वारी भाले तलवार चालवणं
व्यायाम कुस्ती मलखांब सराव निपुणII1II
स्वराज्य रक्षिणी फिरंग मर्दिनी महान
शस्त्र धारणी समर भवानी आदर्श द्योत
लक्ष्मीबाई क्रांती नायिका करी सचेतनII2II
महापराक्रमी चतुर युद्ध शास्त्र निपुण
सैन्यां करी आश्वासक गरिबांचे करी कल्याण
इंग्रजांशी लढताना पत्करले वीर मरणII3II
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677