बांदा :
बांदा येथील गोगटे -वाळके कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. रमाकांत सिताराम गावडे यांना राजस्थान येथील श्री. जे.जे.टी. विद्यापीठाकडून ‘कॉमर्स’ या विषयात ‘विद्या वाचस्पती’ (पीएच.डी.) पदवी प्राप्त झाल्याबद्दल न्यु सबनीसवाडा सावंतवाडी येथील डोंगरे पाणंद मधील मॉडर्न कॉलनी येथील रहिवासी यांनी हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कॉलनीतील रहिवाशी आणि माजी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याला मॉडर्न कॉलनीतील जेष्ठ नागरिक रामा गावडे, गजानन सावंत, राजाराम बोडके सर, बाळासाहेब पाटील सर, तसेच सावंत वाडीतील क्रिकेट समलोचक महेश डोंगरे, सुर्यकांत सांगेलकर सर , लक्ष्मण राणे, प्रकाश चौधरी, दीपक गावडे, नंदु रेडकर, अजित बोडके, शैलेश गावडे, सोनाली गावडे , संकल्प गावडे, आणि कॉलनीतील महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख वक्ते माननीय रत्नाकर धाकोरकर यांनी बोलताना असे सांगितले की, रमाकांत गावडे सरांच्या संशोधना बाबत माहिती दिली आणि त्यांच्या संशोधनाचा विषय “कोकणातील काजू कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्यांचा अभ्यास” हा होता. प्रा. रमाकांत गावडे यांनी सदर शोधप्रबंधामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयांतील 217 कारखान्यातील जवळजवळ 400 कामगारांचा अभ्यास करून उपलब्ध माहितीचे वर्गीकरण व विश्लेषण केले. त्यांना कोणकोणत्या अडचणी येतात व त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक समस्या काय आहेत,कोणत्या सोईसुविधा पुरवितात, त्याची पूर्तता करण्यासाठी आजच्या काळात सेवा-सुविधांमध्ये गुणवत्तापूर्ण वाढ करण्यास काय करणे आवश्यक आहे,तसेच काजू कारखान्यात काम करणा-या कर्मचा-यांना येणा-या इतर समस्या याविषयी सविस्तर संशोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या संशोधनाचा कोकणातील काजू कारखान्याचा विकास व वृद्धी होण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर प्रास्ताविकातून मा. सुर्यकांत सांगेलकर सरानी सांगितले की,प्रा. रमाकांत गावडे हे आमच्या माॅडर्न कॉलनीचे अध्यक्ष असून सामाजिक कार्याची आवड असणारे आहेत. हे मागील 27 वर्षापासून बांदा येथील डॉ. गायतोंडे यांनी स्थापन केलेल्या गोगटे- वाळके महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून कॉमर्स या विषयातून एम कॉम आणि अर्थशास्त्र विषयात एम.ए पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी कामगारां संबधित यू. जी. सी.मुंबई विद्यापीठाचे लघु संशोधन प्रकल्पही पूर्ण केला आहे.कॉमर्स विषयाशी निगडीत विविध विषयांवर संशोधनपर लेख त्यांचे प्रकाशित झाले आहेत. या त्यांच्या यशात त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. तसेच प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या त्यांच्या पत्नी सौ.रेश्मा रमाकांत गावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुर्यकांत सांगेलकर यांनी तर आभार गजानन सावंत सर यांनी मानले.