You are currently viewing शिवचरण उज्जैकर फाउंडेशनच्या राज्य प्रसिद्धीप्रमुख पदी – बबनराव आराख

शिवचरण उज्जैकर फाउंडेशनच्या राज्य प्रसिद्धीप्रमुख पदी – बबनराव आराख

पुणे :

 

सामाजिक व साहित्य क्षेत्रामध्ये अग्रगण असलेले मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन हे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित आहे. फाउंडेशन द्वारे राज्यांमध्ये दरवर्षी दोन संमेलन आयोजित केली जातात एक राज्यस्तरीय अखिल भारतीय मराठी साहित्य सदर साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्र मधून सर्व स्तरातील साहित्यिक, कवी सहभागी होत असतात. फाउंडेशन द्वारे आजपर्यंत महाराष्ट्र सह गोवा, दिल्ली, व इतर राज्यातही साहित्यसंमेलने झालेली आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत साहित्यिक, कवी यांनी त्यामध्ये हजेरी लावली आहे .या संमेलनाद्वारे साहित्य चळवळ प्रचार आणि प्रसार, वाचन संस्कृती व नवोदिकांना प्रोत्साहन हा या फाउंडेशनचा हेतू आहे. सदर फाउंडेशन राज्यात सांस्कृतिक व साहित्यिक चळवळ चालवणारे हे एकमेव फाउंडेशन असून संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांनी या फाउंडेशनची गेल्या पंधरा वर्षांपूर्वी स्थापना केली असून त्याचे संपूर्ण राज्यभर जाळे पसरले आहे. उज्जैनकर फाउंडेशन द्वारे अनेक साहित्यिक, कवी यांची पुस्तके साहित्य प्रकाशित होत असतात. त्याचबरोबर प्रोत्साहन म्हणून अनेक प्रतिभावंत कवी साहित्य कलावंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्काराद्वारे पुरस्कृत केल्या जाते.

दरम्यान, कवी-लेखक साहित्यिक बबनराव आराख राहणार ता चिखली जि. बुलढाणा यांची उज्जैनकर फाउंडेशनच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी नुकतीच मान्यवरांच्या उपस्थितीत झूम मीटिंग द्वारे निवड करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर तसेच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शंकरराव अनासुने, मनोहरराव पवार राज्य अध्यक्ष डॉ.सतीश तराळ राज्य खजिनदार रामदास कोरडे, विदर्भ विभागीय अध्यक्ष डॉ. पंढरीनाथ शेळके नासिक जिल्हा विभागातील पदाधिकारी, संभाजीनगर जिल्हा संपर्कप्रमुख सर्जेराव साळवे, राज्यभरातील अनेक साहित्यिक व फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. शिवचरण उज्जैनकर उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण यांनी, अनेक साहित्य पुरस्कार प्राप्त तसेच, सामाजिक कार्य तथा साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल, कवी बबनराव आराख यांची राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली.

बबनराव आराख यांच्या विविध वृत्तपत्र व अनेक प्रातिनिधिक काव्यसंग्रहात असंख्य कविता प्रसिद्ध असून, वाचन छंद प्रेमी, साहित्य समूह प्रस्तुत ‘प्रज्ञासुर्य’ या प्रातिनिधिक काव्यसग्रहाचे संपादन केले आहे. वाचन छंद प्रेम साहित्य समूहाचे ते संस्थापक असून, विविध उपक्रम राबवले जातात.

सदर निवडीबद्दल अनेक मान्यवर साहित्यिक व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सदर मिटींग मध्ये उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री विजय सोनवणे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.डॉ. कृष्णा शहाणे, नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रा. डॉ. प्रशांत रणसुरे, राज्य सहसचिव डॉ. अशोक शिरसाठ, महाराष्ट्र विभागीय सल्लागार रूपालीताई चिंचोलीकर, मराठवाडा विभागीय संघटक सविता बोरकर, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग दैवज्ञ बुलढाणा जिल्हा समन्वयक बाळूभाऊ इटणारे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा