अपघातग्रस्त एस.टी कर्मचाऱ्यांना न्याय देणार…
खासदार नारायण राणे:कुडाळ आगाराच्या कर्मचाऱ्यांना विजापूर येथे झाला होता अपघात..
कुडाळ
येथील डेपोत झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याची ग्वाही खासदार नारायण राणे यांनी दिली. सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी खासदार राणे यांच्याकडे करण्यात आली होती.
दि. १२ जुन रोजी कुडाळ-विजापूर एस.टी बस घेऊन गेलेल्या चालक रमेश मांजरेकर व वाहक सचिन रावले यांना विजापूर आगारातील भरधाव वेगाने येणाऱ्या कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसने विजापूर आगारात जोरदार धडक दिली त्यामध्ये कुडाळ आगारातील दोन्ही कर्मचारी गंभीर जखमी झाले त्यातील रमेश मांजरेकर या चालकाचा पाय काढण्यात आला. या अपघातातील जखमी कर्मचाऱ्यांना भविष्यात परिवहन महामंडळाकडून नोकरी बाबतची हमी मिळावी तसेच ज्या विजापूर आगाराच्या कर्मचाऱ्यांमुळे हा अपघात झाला त्यांची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी, महाराष्ट्र राज्य या संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर, कुडाळ आगार अध्यक्ष दादा साईल, विभागीय सरचिटणीस रोशन तेंडोलकर, विभागीय प्रसिद्ध प्रमुख मिथुन बांबुळकर तसेच कुडाळ आगारातील कर्मचारी एम.एन. आंबेडकर, निलेश वारंग, तावडे, साई पारकर यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, संदीप कुडतडकर आदी उपस्थित होते.
सेवाशक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य संघटनेचे सिंधुदुर्ग विभागीय उपाध्यक्ष निलेश तेंडुलकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही निवेदन पाठवून या गंभीर दुर्घटनेकडे लक्ष वेधले असून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही यासंदर्भात कुडाळ आगारातील कर्मचारी भेट घेणार आहेत.
संघटनेने दिलेल्या निवेदनात या गंभीर दुर्घटनेबाबत प्रशासनाने केलेल्या हलगर्जी पणामुळे कुडाळ आगारात काम बंद आंदोलन झाल्याचे म्हटले असून याबाबत प्रशासनाला योग्य ती समज द्यावी अशी मागणी केली आहे. हि दुर्घटना झल्यानंतर कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी माजी खासदार निलेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही विभाग नियंत्रकाशी चर्चा केली होती त्यानंतर जत आगाराच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन विजापूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला अशी माहिती सेवा शक्ती संघर्ष एस.टी कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आली.
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*
*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
*🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*
🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*
*📱संपर्क क्रमांक :*
*7057421082*
*9028466701*
*9420156771*
✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*