You are currently viewing सौख्यचंद्रिका

सौख्यचंद्रिका

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणेचे संस्थापक अध्यक्ष वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*सौख्यचंद्रिका*

〰️〰️〰️〰️

कविताच गझल हझल

मौनातुनी ओघळलेली

 

तिजला माळावी कशी ?

शब्दातुनीच ती उमललेली

 

प्रीतभावनांच ती प्रीतवेडी

ऋतुऋतूतुनी लगडलेली

 

मृत्तिकेसही लळा सौरभी

तीच वसुंधरेस बिलगलेली

 

आनंदघनी तीच परमानंदी

चराचरी लाघवी गंधाळलेली

 

भावशब्दी ही सौख्यचंद्रिका

गझलकाव्यात , भारावलेली

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

*रचना क्र.११३/

*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*

*📞 ( 9766544908 )*

प्रतिक्रिया व्यक्त करा