*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”लंकेशाचा वध”*
लंकेशाचा झाला वध व्यर्थ अहंकारानं
राम सांगी मातेला मी एक कारण निमित्तIIधृII
महाज्ञानी महाप्रतापी प्रकांड पंडित
महाबलशाली चार वेदांचा ज्ञाता निपुण
शिवतांडव स्त्रोत्र रचिता लंकेश शिवभक्तII1II
कोणालाही सोडले नाही अहंकारानं
कोणत्या श्वासाचे धरू नये अभिमान
शेवटी श्वास सुद्धा जाईल तन सोडूनII2II
सत्ता संपत्तीचा झाला त्याला अहंकार
सटवाई लिहिते भविष्य जाणे कोण
मृत्यू अटळ विधी लिखित समय स्थान II3II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.