You are currently viewing पराभवाला खचून न जाता येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी कामाला लागा – विनायक राऊत

पराभवाला खचून न जाता येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी कामाला लागा – विनायक राऊत

कुडाळ : 

शिवसेना नेते मा. खासदार विनायक राऊत यांनी आज कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी यांची बैठक महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे घेतली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना आणि इंडिया आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत धनशक्तीचा विजय झाला असला तरी पराभवाला खचून न जाता येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजय मिळविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने नव्या उमेदीने कामाला लागा असे आवाहन मा. खा.विनायक राऊत यांनी केले.

यावेळी कुडाळ येथे आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,कोकण उपनेत्या जान्हवी सावंत,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत,काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख,बाळ कन्याळकर, विजय प्रभू,अमरसेन सावंत, मंदार शिरसाट,राजन नाईक, बबन बोभाटे, जयभारत पालव, स्नेहा दळवी, अक्षता खटावकर,किरण शिंदे,संतोष शिरसाट,अतुल बंगे,कृष्णा धुरी,बाळा कॊरगावकर,सचिन कदम,महेश सावंत, योगेश धुरी,बाळू पालव, नागेश ओरोसकर, शेखर गावडे,दीपक आंगणे,संदेश प्रभू, नरेंद्र राणे,बंड्या कुडतरकर,गंगाराम सडवेलकर, कौशल जोशी,संदीप सावंत,सुधीर राऊळ,दिनेश वारंग,प्रभाकर वारंग आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा