वेंगुर्ले :
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींचा देवदर्शन सहलीचा शुभारंभ आज चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी विशाल परब यांनी सर्व वारकरी बंधू भगिनींना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.
मोहिनी एकादशी निमित्त आयोजित केल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यावर वारकरी मंडळींना मोफत देवदर्शन सहल घडवून आणेन, असे अभिवचन दिले होते. त्याची पूर्तता म्हणून तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर, नृसिंहवाडी, महालक्ष्मी, कोल्हापूर अशी तीन दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे. आज त्यांनी ते वचन पूर्ण केले.
याप्रसंगी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींनी विशाल परब यांचे कौतुक करत त्यांना आशीर्वाद दिले. आध्यात्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेकदा परब यांनी संस्कृतीचे जतन केले आहे यावेळी प्रसन्ना देसाई, राजन गिरप, वसंत तांडेल, मनोहर तांडेल, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, सुरेंद्र चव्हाण, वारकरी संप्रदायातील जेष्ठ मंडळी, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.