You are currently viewing बांदा नं.१ केंद्र शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

बांदा नं.१ केंद्र शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

*बांदा नं.१ केंद्र शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत*

*बांदा केंद्रशाळा आदर्शवत* -तहसिलदार श्रीधर पाटील

बांदा*

पी एमश्री जिल्हा परिषद बांदा नं.१ केंद्र शाळा ही उपक्रमशील शाळा असून या शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम हे आदर्शवत असल्याचे मत सावंतवाडी तालुक्याचे तहसीलदार श्रीधर पाटील‌ सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षांच्या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.
उन्हाळी सुट्टीनंतर शनिवार पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असून या दिवशी शाळेत दाखल‌ झालेल्या विद्यार्थ्यांची मोटार‌ सायकल‌वरून ढोल, लेझीम यांच्या गजरात बाईक रॅली काढण्यात काढण्यात . या रॅलीत विविध कार्टून व प्राणी यांच्या वेशभूषा आकर्षक ठरल्या.
यावेळी पहिलीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे झाडांचे रोप देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले तसेच विविध स्पर्धात्मक उपक्रमात सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला,उमेद फौंडेशनच्या वतीने गरजू होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारून शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रूजावी यासाठी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी शाळेला पाच हजार रूपयांची रोख शालेय वाचनालयातील पुस्तके खरेदी करण्यासाठी शाळेकडे सुपूर्द केली.
यावेळी केंद्र प्रमुख नरेंद्र सावंत, प्रथम इन्फोटेक फाऊंडेशनच्या जिल्हा समन्वयक भामिनी शेटकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष संपदा सिध्दये, सदस्य हेमंत मोर्ये
,संतोष बांदेकर,हेमंत दाभोळकर,बांदा तलाठी फिरोज खान, विषयतज्ज्ञ विजय पाटील आदि उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षक जे.डी.पाटील तर आभार शांताराम असनकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शिक्षक शिक्षक व पालक यांनी परिश्रम घेतले.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा