वायरी भुतनाथ मोरेश्वरवाडीत घर आगीत जळून खाक; सुमारे साडे तीन लाखाचे नुकसान…
मालवण
वायरी-भूतनाथ मोरेश्वरवाडी येथील विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या राहत्या घरास रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात घरासह, आतील सर्व साहित्य, रोख रक्कम जळून खाक झाली. यात तोडणकर यांचे सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
याबाबतची माहिती अशी- तालुक्यातील वायरी भूतनाथ येथील मोरेश्वरवाडी येथे विक्रम तोडणकर यांचे राहते घर आहे. तोडणकर यांचा मासेमारीचा व्यवसाय असल्याने ते रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान घरास कुलूप लावून व्यवसायासाठी सहकाऱ्यांकडे गेले. तर तळाशील येथील होडी दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या किशोर चोडणेकर यांच्या घराकडे घरातील नातेवाईक गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. यात रात्री साडे बारा वाजण्याच्या दरम्यान घरास अचानक आग लागली. आगीचा लोळ पसरल्याचे दिसताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र आगीच्या भडक्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण बनले. यात संपूर्ण घर जळून खाक झाले.
या आगीत एलईडी टीव्ही, लाकडी कपाट, फॅन, शेगडी, रोख २३ हजार ७०० रुपये, इतर कागदपत्रे व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच आज सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी वसंत राठोड यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. आगीत तोडणकर यांचे सुमारे साडे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
संवाद मीडिया*
👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕👩⚕
*प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!प्रवेश सुरु!!*
संजिवनी कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२४-२५*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
कामथे हायस्कूल, कामथे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२४-२५* करिता
*GNM* Nursing -3 Years -12th
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
*या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.*👇
🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.
*संपर्क फोन नंबर*
*📲7276850220*
*📲8308723227*
*📲8087865276*
www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com
*जाहिरात लिंक*👇
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*