*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*’कुठे हरवले बालपण’*
************************
भातुकलीचा खेळ आठवला की
आठवते बालपण
बालपणीच्या गंमती जमती
आठवता हरवून जाते मन
खरचं किती छान असते बालपण
शाळा बुडवून खूप फिरायचे
अभ्यासला बहाणे असायचे
चोरून लपून चिंचा आवळे तोडायचे
सारे सवंगडी एकत्र खायचे
नाही कुणाचा धाक
नाही कुणाचे बंधन
लहानपणीच्या आठवणी
आठवल्या की वाटत
खरचं किती छान असते हो बालपण
हट्ट असायचा बाबांकडे
आई द्यायची खाऊ
खाऊ लपवताना दादा म्हणायचा
आली बघा माऊ
आपडी थापडी पळापळी खेळताना
फूटायचे किती रांजण
खेळता खेळता रोज असायचे
दोघांमध्ये भांडण
खरचं किती छान असते बालपण
खेळणीसाठी रडायचे
नट्टापट्टा करताना
आईचे धपाटे खायचे
टिकली पावडर लावताना
मस्त हसायचा दर्पण
पावसात चिंब व्हायला
कमी पडायचे आंगण
खरचं लहानपणीच्या आठवणी
आठवल्या की वाटते
किती छान असते हो बालपण
आता सारेकाही बदलले
सर्व काही मोबाइलमय झाले
भेटीगाठी नाही, हसणे बोलणे नाही
गप्पा टप्पा विसरून सारे
चॅटिंग मधे अडकले
इंस्टाग्राम फेसबुकमुळे तर
माणसा माणसात अंतर वाढले
कोण कुठे कोण कुठे
नाही राहिले कुणा मधे आपलेपण
खरचं किती छान असते हो बालपण
आई बाबा असतानाही
सोबत कोणी खेळत नाही
अवतीभोवती फिरताना ही
जवळ कोणी घेत नाही
नाही जिव्हाळा नाही प्रेम
राहिले नाही घरपण
गात नाही कोणी अंगाई
पाळणा घरात जाते बालपण
लहानपणीच्या आठवणी
आठवल्या की वाटते
खरचं किती छान असते हो बालपण
आई बाबा नसतात घरात
घर असते सुने सुने
सगळे काही असुनही
असते सारे उणे
सुखदुःखाच्या गप्पा नसतात
असते नुस्ती तू तू मैं मैं
किती आणि कसे समजून सांगावं
कुणाला काहीच कळत नाही
घर असुन ही घर नसते
येते खूप दडपण
घरात बसुन ही कशात लागत नाही मन
कसे सांगावे यार हो आता
कुठे हरवले बालपण’
*संजय धनगव्हाळ*
*अर्थात कुसुमाई*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७