वेंगुर्ले पोलीस ठाण्यातर्फे अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत शहरात काढण्यात आली जनजागृती रॅली.
वेंगुर्ले
वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या माध्यमातून आज अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम घेण्यात आली यामध्ये काही शाळा, कॉलेज ना भेट देऊन अंमली पदार्थांचे नुकसान आणि त्याचे दुष्परिणाम यावर मार्गदर्शन करण्यात आले. तर तसेच शहरात दाभोली नाका ते बाजारपेठ पर्यंत विद्यार्थ्यां समवेत रॅली काढून या बाबत जनजागृती करण्यात आली.
या कार्यक्रमामध्ये आर. के. पाटकर हायस्कूल, मदर तेरेसा इंग्लिश स्कूल तसेच बॅ. खर्डेकर कॉलेज वेंगुर्ला येथे मार्गदर्शन सत्र राबविण्यात आले. या मोहिमेअंतर्गत दाभोली नाका ते बाजारपेठ पर्यंत विद्यार्थ्यां समवेत रॅली काढण्यात आली. ज्यामध्ये मदर तेरेसा इंग्लिश स्कूल च्या जवळपास १०० ते १५० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच खर्डेकर महाविद्यालय, पाटकर हायस्कूल आणि वेंगुर्ला बस स्थानक या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन करण्यात आले. वेंगुर्ला पोलिस निरीक्षक संदीप भोसले आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी अंमली पदार्थ आपल्या जीवनासाठी कसे घातक आहे आणि त्याचे काय दुष्परिणाम भविष्यात भोगावे लागतात याबद्दलचे मार्गदर्शन केले. युवा पिढी आमली पदार्थांच्या विळख्यात अडकत असताना जनजागृती करिता वेंगुर्ला पोलिसांकडून दर वर्षी हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतो.
यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत जाधव, पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तावडे, पोलिस हवालदर सखाराम परब, पोलिस महिला हवालदार कदम, महिला हवालदार दिपा धुरी, वाहतूक पोलिस अंमलदार गौरव परब, मनोज परुळेकर, पोलिस प्रथमेश पालकर, पाटकर हायस्कूलचे बोवलेकर सर, मदर तेरेसा स्कूल प्राध्यापक फा. फेलिक्स लोबो, खर्डेकर महाविद्यालयचे प्राचार्य एम. बी. चौगुले, प्राध्यापक गावडे, आगारप्रमुख कुंभार आणि कर्मचारी या सर्वांनी उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी केला.