You are currently viewing “माँ विंध्यवासिनी

“माँ विंध्यवासिनी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*”माँ विंध्यवासिनी*” 

 

विंध्यवासिनीला करू साष्टांग नमन

भक्ता पावे माता देई शुभ वरदानIIधृII

 

सुंदर मुख कमल असे सुलोचन

शिवाला आदरे शिवंपद करी प्रदान

तुझे अस्तित्व आहे सृष्टी चराचरांतII1II

 

गंगा किनारी विंध्य पर्वतां स्थानापन्न

विंध्यवासिनी आहे शक्तिपीठ प्रसिद्ध

विसरतो मोह माया घेता तुझे दर्शनII2II

 

विष्णु भगवंताची तू आहेस बहीण

कृष्ण अवतारांत तुझे महत्त्व अनन्य

नंद यशोदा मातेची कन्या भाग्यवानII3II

 

कंसाला शाप देत झेपावली आकाशांत

अंत होणार कंसा सांगून झालीस लुप्त

विंध्य पर्वतावर देवी झाली अवत्तीर्णII4II

 

त्रिशूल रत्नधारिणी करी महिषासुर वध

कपाल शूल धारी करी शुंभ-निशुंभ मर्दन

गदा धारी नाश करी असूर चंड मुंडII5II

 

आदिमाया अस्तित्व सृष्टी आधीपासून

राहील स्मरण तुझे निरंतर चिरंतन

शरण जाता मातेला दुःख दारिद्र्य हरणII6II

 

श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा