*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अहिराणी बोलीतील अप्रतिम काव्यरचना*
*आते डोया उघाडारे….*
झुयझुय पानी व्हाये मना मयाना वाटम्हा
आम्ही चालूत पानीन्हा पानी पिऊत हातम्हा
थकावा तो निंघी जाये तोंडवर फिरे पानी
इने सुगरन घरटं बाभुयवरनी ती रानी…
बांध बांध तो हिरवा झाडे निमना डोलेत
किलबिल पाखरूनी खोपा वारावर हालेत
होला हु हु हु हु बोले म्हजार टिटवी कोकाये
देखताज टिटवीले मना जीव कितला भ्याये..
तोडी तोडी झाडेसले बांध वावर उजाड
मैलोमैल शिवारम्हा आते दिखे ना हो झाडं
वड पिप्पय निम नि, आमराई उजाडनी
गई दाट छत्रछाया जीव करे पानी पानी…
वडना त्या कपारीम्हा पानपोई थंडगार
आते बाटलीनं राज व्हवो उनम्हा बेजार
झाडे ग्यात उना ए सी शेतकरी लेस फाशी
कसा पडी सांगा पानी ढग सेतस उपाशी…
झाडे दिसताज ढग तठे उतरस खाली
थंडगार येस वारा खालीकरस पखाली
मालामाल करी जास शेतशिवार टरारे
झाडे लावा झाडे लावा आते डोया उघाडारे…
प्रा.सौ.सुमती पवार.नाशिक.
(९७६३६०५६४२)