कनकनगरमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव…
कणकवली
शहरातील कनकनगर परिसरातील दहावीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा नागरिकांतर्फे दुर्गाराम हॉल येथे गुणगौरव करण्यात आला.
यावेळी निवृत्त शिक्षिका श्रीमती जांभवडेकर, अमिता सावंत, अकुंश सावंत, संतोष सावंत, विलास जाधव, प्रशांत सावंत, प्रशांत बोभाटे, प्रवीण सावंत, श्री. धुपकर, प्रकाश सावंत, मनोहर सावंत, हर्षद शिखरे, सुनील दळवी, सुभाष चव्हाण, मंगेश देसाई, संदीप सावंत, सुशांत मर्गज, राजू मुगणेकर, संतोष यादव आदी उपस्थित होते. निधी सावंत, भावना निग्रे, अनुष्का देसाई, यश मेस्त्री, दर्शन साळवी, ऋषिकेश यादव, योगिता ढवळ, मृणाल लांबर, संचित कदम, अथर्व एकावडे या गुणवंतांचा ज्येष्ठांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत मर्गज यांनी केले.