कल्पना
तुझी कल्पना करायचो,
तू असणार कशी?
चांदण्यासारखी हसणारी,
की फुलांसारखी खुलणारी.
लाजरी सारखी लाजणारी,
की मोगऱ्यासारखी दिसणारी?
तुझी कल्पना करायचो,
तू असणार कशी?
खळी पाडून गालावर,
स्मित हास्य करतेस.
लाजत मुरडत येताना,
कंबर हळूच लचकवतेस जशी.
तुझी कल्पना करायचो,
तू असणार कशी?
पाहून तुझं रूप मनोहर,
भाळलो मी तुझ्यावर.
वेडं झालं मन माझं,
भावना झाल्या अनावर. तरीही..
तुझी कल्पना करायचो,
तू असणार कशी?
झालीस जेव्हा तू माझी,
कळून चुकले तेव्हाच मजला..
तू होतीस तशीच…
निर्मळ झऱ्यासारखी…
अथांग सागरासारखी….!!
तुझी कल्पना करायचो…!!
(दीपी)
दीपक पटेकर
८४४६७४३१९६