You are currently viewing इण्डेन गॅसच्या अनियमित सेवेबाबत मनसे व तारकर्ली ग्रामस्थांची कार्यालयावर धडक…

इण्डेन गॅसच्या अनियमित सेवेबाबत मनसे व तारकर्ली ग्रामस्थांची कार्यालयावर धडक…

८ तारखेपर्यंत सेवा सुरळीत करा, अन्यथा १० तारखेला तीव्र आंदोलनाचा इशारा..

मालवण
मालवण तारकर्ली येथील ग्रामस्थांना इंण्डेन गॅस एजन्सी मार्फत नियमित वेळेत गॅस सिलिंडर घरपोच केला जात नसल्याने आज तारकर्ली येथील ग्रामस्थ व महाराष्ट्र नवनिर्मन सेनेच्या कार्यकर्त्यांनी मालवण इंण्डेन गॅस एजन्सीच्या कार्यालयावर धडक देत नियमित वेळेत घरपोच गॅस सिलिंडर देण्यात बाबत येत्या ८ जानेवारी पर्यंत नियोजन करण्यात यावे अन्यथा येत्या १० जानेवारी रोजी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी मनसे कार्यकर्ते व तारकर्ली ग्रामस्थांनी दिला आहे.

तारकर्ली येथील ग्राहकांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी मनसे कडून घरपोच गॅस सिलिंडर साठी इण्डेन गॅस एजन्सी ला निवेदन देण्यात आले.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालवण तारकर्ली इंडियन गॅस धारकाना दर शुक्रवारी एजन्सीचे सहकारी संघाची गॅस सिलेंडर डिलिव्हरी गाडी घरपोच गॅस सिलिंडर डिलिव्हरी साठी वेळो अ वेळी तारकर्ली गावात आपल्या मनमानी कारभार नुसार येते. आम्हा ग्राहकांना शुक्रवार सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत गॅस सिलेंडर रस्त्यावर घेऊन ताटकळत उभे राहावे लागते. ग्राहकाला योग्य ते वजन न करता व घरपोच गॅस सिलिंडर डिलिव्हरी न देता गॅस सिलेंडर रस्त्यावर राहण्यास भाग पाडले जाते.नियमित वार ठरलेलाअसून देखील गाडी कधी देवबाग तर कधी देवलीला जाते व कधीकधी गॅस सिलेंडर वितरीत न करताच माघारी परतते. यावेळी गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे असे तोंडी सांगितले जाते. घरपोच सिलेंडर न देता कंपनीच्या नियमाप्रमाणे ग्राहकाला भाड्यापोटी परतावा रक्कमही दिली जात नाही. तर गोडावून मधून सिलेंडर आणल्यास पंधरा रुपये ही परतावा रक्कम खूपच कमी आहे.या सर्व गोष्टींचा ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. या बाबत इंण्डेन गॅस एजन्सीच्या सहकारी संघाने विचार करावा.येत्या ८ जानेवारी पर्यंत ग्राहकांना नियमित वेळेवर घरपोच गॅस सिलेंडर न मिळाल्यास १० जानेवारीनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.ग्राहकांच्या रागाचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडली तर याला सर्वस्वी जबाबदारी आपल्या सहकारी संघाची राहील असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष शैलेश अंधारी, विभाग अध्यक्ष देवबाग मतदार संघ बजरंग कुबल, शाखाध्यक्ष तारकर्ली प्रसाद बापर्डेकर,मनविसे विभाग अध्यक्ष देवबाग मतदार संघ प्रतीक कुबल,मनविसे उपतालुकाध्यक्ष मालवण, संकेत वाईरकर,मनविसे शहराध्यक्ष मालवण, साईराज चव्हाण, उपतालुकाध्यक्ष वेंगुर्ला, विशाल माडये, आदी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदना सोबत इंण्डेन गॅस सिलिंडर वापरकर्त्या १५ ग्राहकांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा