You are currently viewing पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय नको, काळजी घ्या – नितेश राणे

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय नको, काळजी घ्या – नितेश राणे

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय नको, काळजी घ्या – नितेश राणे

घाट मार्ग व दरडीबाबत सतर्क रहा, वैभववाडीत सूचना

वैभववाडी

पावसाळ्यात नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती काळजी घ्या, अपूर्ण कामे पूर्ण करा, अन्यथा गय करणार नाही, असा इशारा आमदार नितेश राणे यांनी आज नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. दरम्यान तळेरे ते गगनबावडा या महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण कामासह घाट मार्ग वाहतूक कधी सुरू होणार? असा सवाल करून दरड कोसळणार नाही यासाठी योग्य ती उपाययोजना करा अशा सूचना दिल्या.
श्री. राणे यांच्या उपस्थितीत आज नगरपंचायत आढावा बैठक घेण्यात आला. यावेळी उपस्थित ठेकेदार व अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी भाजपा मंडळ अध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, उपनगराध्यक्ष संजय सावंत, माजी सभापती अरविंद रावराणे , माजी सभापती भालचंद्र साठे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर, तालुका महीला अध्यक्ष प्राची तावडे, नगरसेवक विवेक रावराणे, नगरसेवक रोहन रावराणे, प्रदीप रावराणे, डॉ. राजेंद्र पाताडे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, संतोष पवार, नगरसेविका सुंदरा निकम, संगीता चव्हाण, सुभाष रावराणे, त्याचबरोबर महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी अतुल शिवनिवार, सार्वजनिक बांधकाम चे अधिकारी श्री. जोशी, नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज कांबळे व अधिकारी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. राणे यांनी शहरात झालेल्या संपूर्ण कामांचा यावेळी आढावा घेतला. जवळपास २५ विकास कामे ही पूर्णत्वास गेली असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले. वैभववाडी शहरातील गटारे, संभाजी चौक सुशोभिकरण महामार्ग नजीकची गटारे आदी प्रलंबित कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. ज्या ठेकेदारांच्या नावावर कामे आहेत. त्यातील अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावी. कोणतेही कारण चालणार नाही. कामे न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार असा इशारा श्री. राणे यांनी दिला आहे. त्याचबरोबर पूर्ण झालेल्या कामाबाबत प्रचार प्रसिद्धी झाली पाहिजे. जनतेपर्यंत सदर कामे पोहचली पाहिजे. ती कामे पोहचवण्याची जबाबदारी संबंधित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांची असल्याचे राणे यांनी सांगितले.
शहरातील शांतिनदी ते सुख नदी दरम्यानचा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारित आहेत. या मार्गावरील गटारे तात्काळ साफ करून घ्या. अशा सूचना आमदार नितेश राणे यांनी अधिकारी अतुल शिवनिवार यांना दिल्या. येत्या दोन दिवसात महामार्गालगतची गटारे साफ केली जातील. असे शिवनिवार यांनी सांगितले. तरेळे ते गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गावर सूरु असलेल्या रस्ता रुंदीकरण कामाचाही आमदार नितेश राणे यांनी आढावा घेतला. तर घाट मार्गे वाहतूक कधी सुरू होणार असा सवाल यावेळी करण्यात आला. अजून कामे अपुरी असल्याने त्याच बरोबर दरडी वारंवार कोसळत असल्याने घाट मार्ग असुरक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कामे तात्काळ पूर्ण करा आणि घाटमार्ग वाहतुकीसाठी पुर्ववत करा, अशा सूचना दिल्या.

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀🤵‍♀

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025 सुरू*

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे
*महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी*.
एस.एन.डी. टी. महिला विद्यापीठ संलग्न

*BCA प्रवेश प्रक्रिया 2024- 2025*

बारावीनंतर बीसीए डिग्री कोर्स 2024-25 ऍडमिशन करिता आजच आपली नोंदणी खाली दिलेल्या लिंक वरती करावी .

https://forms.gle/3MAKqpBiCSpKYmB5A

कोणत्याही शाखेच्या( आर्ट्स /कॉमर्स/ सायन्स) , गणित किंवा गणित विषया शिवाय बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना येथे प्रवेश मिळू शकतो.

*अधिक माहितीसाठी* 👇
*📲7972997567*
*📲9420274119*

या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेट द्यावी.

*पत्ता: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे महर्षी कर्वे महिला महाविद्यालय रत्नागिरी,साखरतर रोड, शिरगाव ,रत्नागिरी.*

*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138548/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा