You are currently viewing नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी  24 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करा

नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी  24 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करा

नोंदणीकृत सेवा सोसायट्यांनी  24 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करा

सिंधुदुर्गनगरी 

 सेवा सोसायट्यांना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयचे शिफारस पत्र घेऊन नाव नोंदणी झाल्या आहेत. अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे आपले प्रस्ताव दि.24 जून 2024 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत कार्यालयात स्वहस्ते सादर करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त ग.पा. चिमणकर यांनी केले आहे.

बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यांच्या उद्देशाने रु. 3 लाख इतक्या रक्कमेची कामे विनानिविदा उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभाग, शासन निर्णय क्रमांक इएसई-२००३/प्र.क्र.१९१/रोस्वरो-१, दि. 01 फेब्रुवारी 2006 जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काम वाटप समितीकडे जिल्हयातील विविध शासकीय कार्यालयाकडून कंत्राटी कामाकरिता पत्र प्राप्त झाली आहेत.

आवश्यक अटी व शर्तीच पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेली तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा