You are currently viewing आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये करियर कट्टामार्फत फूड व्हॅनचे उद्घाटन संपन्न

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये करियर कट्टामार्फत फूड व्हॅनचे उद्घाटन संपन्न

*आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये करियर कट्टामार्फत फूड व्हॅनचे उद्घाटन संपन्न*

वैभववाडी

आनंदीबाई रावराणे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वैभववाडी येथे विद्यार्थिनींना व्यवसायामध्ये सक्षम बनवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आज दिनांक १२ जून २०२४ रोजी व्यावसायिक फूड व्हॅनचे उद्घाटन संपन्न झाले. महाविद्यालयामध्ये सुरू असलेल्या करिअर कट्टा विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोकण कन्या योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना व्यावसायिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानित तत्त्वावर फूड व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे. या फुड व्हॅनचा उपयोग करून लाभार्थी विद्यार्थिनी अनेक समुद्री खाद्यपदार्थ व इतर कोकणातील लोकल पदार्थांच्या विक्रीचा व्यवसाय करणार आहेत. ही फूड व्हॅन महाविद्यालयाला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट यांचे कडून अनुदानित तत्त्वावर उपलब्ध करून दिलेली आहे. तसेच महाविद्यालयातील लाभार्थी विद्यार्थिनींना या व्यवसायासाठी आवश्यक असणारे हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचेमार्फत विवा कॉलेज विरार येथे मोफत पणे देण्यात आलेले आहे. कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण समुद्री पदार्थांची चव संपूर्ण महाराष्ट्राला मिळावी व येथील पदार्थांना मोठी मागणी वाढावी यासाठी करिअर कट्टा विभाग या कोकण कन्या उपक्रमाची संपूर्ण महाराष्ट्रभर जाहिरात करणार आहे.
या फुडव्हॅनचे उद्घाटन महाविद्यालयाच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांचे शुभ हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या स्थानिक समितीचे सचिव श्री.प्रमोद रावराणे व विश्वस्त श्री.शरद रावराणे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून वैभववाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा नेहा माईणकर व उपनगराध्यक्ष श्री. संजय सावंत हे उपस्थित होते. नगराध्यक्ष नेहा माईनकर यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी महाविद्यालयामध्ये होत असलेल्या प्रयत्नांची प्रशंशा केली. तसेच उपनगराध्यक्ष संजय सावंत यांनी आपल्या शुभेच्छा पर भाषणामध्ये वैभववाडीकरांच्या सेवेमध्ये आरोग्यदायी पदार्थांची उपलब्धी करून दिल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा करियर कट्टा प्राचार्य प्रवर्तक डॉ.सी.एस.काकडे यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणामध्ये महाविद्यालयाला कोकण कन्या योजनेचा लाभ मिळवून दिल्याबद्दल व लाभार्थी विद्यार्थिनींना उत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष श्री. यशवंत शितोळे यांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी करिअर कट्टा विभागाच्या अनेक योजनांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक करिअर कट्टा जिल्हा समन्वयक डॉ.अजित दिघे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लाभार्थी विद्यार्थिनी जानवी कांबळे हिने केले. महाविद्यालयाच्या या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्नाला वैभववाडी व परिसरातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळेल अशा शुभेच्छा महाराणा प्रताप सिंह शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्याकडून मिळालेल्या आहेत.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, पालक, व पत्रकार बंधू उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा