You are currently viewing नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंच्या विजयात मोठा वाटा असल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांचा भाजपातर्फे सत्कार

नवनिर्वाचित खासदार नारायण राणेंच्या विजयात मोठा वाटा असल्याबद्दल रविंद्र चव्हाण यांचा भाजपातर्फे सत्कार

वेंगुर्ले :

लोकसभा निवडणुकित भाजपा-सेना महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयानंतर प्रथमच वेगुर्ले तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री राविंद्र चव्हाण यांनी लोकसभेच्या निवडणुकित नारायण राणेंच्या विजयात सर्वात मोठा श्री चव्हाण यांचा असल्याबद्दल वेंगुर्ले तालुका भाजपातर्फे रविंद्र चव्हाण यांचा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व जिल्हा नियोजन मंडळ सदस्य तथा माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व श्रीराम-सितामाईचे असलेले स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांत भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य तथा वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्र्वेता कोरगांवकर , पदवीधर निवडणूक जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, प्रदेश सदस्य शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांचा समावेश होता.

यावेळी रविंद्र चव्हाण यांनी, लोकसभेचे भाजपा-सेना महायुतीचे भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी वेंगुर्ले तालुक्याने प्रामाणिक काम करत साडेनऊ हजार मताधिक्य देत उत्कृष्ठ काम केल्याबद्दल तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा कामाबाबत गौरवोदगार काढले.

यावेळी उपस्थित मान्यवरांत पदवीधर संयोजक प्रशांत खानोलकर , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , जि.उपाध्यक्ष अँङ सुषमा प्रभू-खानोलकर, जिल्हा चिटणीस निलेश सामंत,जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, सोमनाथ टोमके, तालुका सरचटणीस बाबली वायंगणकर, जयंत मोंडकर, महिला आघाडी अध्यक्षा सुजाता पडवळ, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ पपू कुबल, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, मठ सरपंच रूपाली नाईक, पेंडूर सरपंच संतोष गावडे,पाल सरपंच कावेरी गावडे , रेडी सरपंच रामसिंग राणे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , रेडी जि.प. मतदार संघाचे माजी सदस्य प्रितेश राऊळ, म्हापण जि.प. मतदार संघाच्या माजी सदस्य वंदना किनळेकर, मच्छिमार सेलचे जिल्हा संघटक दादा केळूसकर, वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, होडावडा उपसरपंच राजबा सावंत ,मठ उपसरपंच बंटी गावडे , सुजाता देसाई, श्रेया मयेकर, सुरेंद्र चव्हाण, अभि वेंगुर्लेकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, बाळू प्रभू , रफिक शेख,लक्ष्मीकांत कर्पे , परबवाडा उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब, श्रीकृष्ण ऊर्फ राजु परब , शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच मनोज उगवेकर,शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे – विजय बागकर – सुधीर गावडे- संतोष शेटकर – जगन्नाथ राणे – महादेव नाईक , तुषार साळगांवकर, अजित नाईक, विजय रेडकर, शरद मेस्त्री ,भूषण आंगचेकर, भुषण सारंग , प्रमोद वेर्णेकर , संदिप देसाई आदींसह पदाधिकारी व कार्यकत्यांचा समावेश होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा