*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*पाऊस*
ढग अंधारून आले
काळा घन बरसला
वारा वेगाने धावतो
थेंब टपोरा धावला
गारा आल्या सरसरा
ढेकळात विखुरल्या
तापलेल्या ढेखळात
कशा वितळून गेल्या
हिरव्यागार रानामध्ये
मयुर नृत्य मोहक
नृत्य करीते बिजली
ढग वाजवी ढोलकं
चिऊताई खोप्यामध्ये
बाळास देई ऊब
आईच्या मऊ स्पर्शात
तिचं सारं घर उभं
सरीवरी येती सरी
डबक्याचे झाले तळे
बेडकाचे डरावणे
एकवटूनिया बळे
स्वप्न डोळ्यात पाहतो
सुखावला बळीराजा
कृपा कर पांडुरंगा
बाप माझा भक्त तुझा
*शीला पाटील. चांदवड.*