You are currently viewing सावंतवाडी अर्बन टीजेएसबी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव

सावंतवाडी अर्बन टीजेएसबी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव

*सावंतवाडी अर्बन टीजेएसबी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव*

*२१ जूनला आयोजित सर्वसाधारण सभेत होणार निर्णय*

सावंतवाडी

सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ठाणे येथील टीजेएसबी सहकारी बँकेत सावंतवाडी अर्बन बँकेचे विलिनीकरण होणार असून या संदर्भात टीजेएसबी बँकेची सर्वसाधारण सभा २१ जूनला होणार आहे. या सभेत सावंतवाडी अर्बन बँकेच्या विलिनीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे.सावंतवाडी अर्बन बँक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा आहे. सावंतवाडी अर्बन बँकेवर आरबीआयने आठ महिन्यांपूर्वी निर्बंध लादले. बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आल्यानंतर बँक अडचणीत आली, या परिस्थितीवर मात करण्यासाठी संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांकडून तीन कोटीचे भागभांडवल जमा करण्याचा निर्धार केला. त्यानुसार दीड कोटीहून अधिक भागभांडवल जमा झाले. अद्याप बँकेवरील निर्बंध उठलेले नाहीत. परंतु अर्बन बँकेच्या विलिनीकरणाच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. यापूर्वी अर्बन बँक अपना सहकारी बँकेत विलिनीकरणाचा प्रस्ताव होता. परंतु त्यावर शिक्कामोर्तब झाले नाही. दरम्यानच्या काळात सावंतवाडी अर्बन बँक अन्य बँकेत विलिनीकरणाबाबत चर्चा होत्या. याच दरम्यान आता सावंतवाडी अर्बन बँक ठाणे येथील टीजेएसबी सहकारी बँकेत विलिनीकरणाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर टीजेएसबी सहकारी बँकेने २१ जूनला सावंतवाडी अर्बन बँक व आणखी एक बैंक विलिन करण्यासाठी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सावंतवाडी अर्बन बँक टीजेएसबी बँकेत विलिन झाल्यानंतर या बँकेचे नाव सावंतवाडी अर्बन राहणार की बदलण्यात येणार, याबाबत अद्याप तरी प्रश्नचिन्ह आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा