सावंतवाडीत समाज प्रबोधन समन्वय समितीमार्फत विद्यार्थ्यांचा गुणगौरव…
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा हा जसा निसर्गाची खान आहे तसे नररत्नांचीही खाण आहे. त्याचबरोबर जिल्हा बुद्धिवंतांची खान असलेला जिल्हा म्हणून या जिल्ह्याचा लौकिक आहे.
हा जिल्हा गुणवत्तेत राज्यात प्रथम असलेला जिल्हा असूनही स्पर्धा परीक्षेत मात्र या जिल्ह्याची टक्केवारी नगण्य असून ही जिल्ह्या ची खरी शोकांतिका आहे. प्रशासनात जोपर्यंत हा जिल्हा पुढे येत नाही तोपर्यंत या जिल्ह्याचा लौकिक वाढणार नसल्याने जिल्ह्यातील स्पर्धकांनी जिल्ह्याचा बोलबाला निर्माण करण्यासाठी गुणवत्तेबरोबरच वेळेचे नियोजन व अपार कष्ट करण्या ची क्षमता निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महेंद्र अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी येथे केले. बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती मार्फत येथील आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री पेडणेकर बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष केशव जाधव हे होते यावेळी विचार पिठावर सायली फाउंडेशनचे प्रा .सचिन पाटकर सावली पाटकर वंचितचे अध्यक्ष महेश परुळेकर आय टी आय चे निर्देशक रामचंद्र जाधव बरर्टीचे समता दूत सगुण जाधव बामसेफ से जिल्हाध्यक्ष भालचंद्र जाधवसामाजिक बांधिलकीचे रवी जाधव चित्रपट कलाकार विवेक वाळकेउपाध्यक्ष जगदीश चव्हाण सचिव विनायक जाधव सामाजिक कार्यकर्त्या भावना कदम मीनाक्षी तेंडुलकर विनायक कांबळे मधुकर जाधव इत्यादीं सह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रा पाटकर व मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण म्हणून करण्यात आले .त्.यानंतर लक्ष्मण कदम यांच्या हस्ते मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .त्यानंतर नामदेव कदम यांनी प्रास्ताविक केले. महेंद्र पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांचे थेट संवाद साधत स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगून तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या .व सध्याचे युग हे मार्केटिंग युग असल्याने आपणही मार्केटिंग आय डॉलबना असा सल्ला देऊन होतकरू दोन विद्यार्थ्यांना मोफत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करण्याचे जाहीर केले. यावेळी आय टी आय चे निर्देशक रामचंद्र जाधव यांनी सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आयटीआय चे विविध अभ्यासक्रम सांगून त्यासाठी लागणारे पात्रता व त्यातून मिळणाऱ्या विविध संधी याबाबतचे मार्गदर्शन केले तर विनायक जाधव यांनी बरर्टी सारथी यासारख्या संस्थांचे आपल्या जिल्ह्यात केंद्र व्हावे असे आवाहन करून इंजिनिअरिंग व त्या अनुषंगाने अभ्यासक्रम इत्यादी चे मार्गदर्शन केले यावेळी जगदीश चव्हाण महेश परूळकर यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य व सन्मानचिन्ह देऊन यथोचित गौरव करण्यात आला .यावेळी सिमरन तेंडुलकर चिन्मय असं न कर या विद्यार्थ्यांनी आप ल्या सत्कार बाबत कृतज्ञता व्यक्त केली .शेवटी अध्यक्ष पदावरून बोलताना केशव जाधव यांनी या कार्यक्रमात सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचा अगत्यपूर्वक उल्लेख करून भविष्यात आपल्या समाजा च्या मुलाने मोठ् मोठी प दे ग्रहण करून समाज बांधिलकी ठेवावे असे आवाहन केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुण जाधव यांनी केले. यावेळी तालुक्यातील बहुजन समाजातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते