You are currently viewing ती गाजलेली उडी

ती गाजलेली उडी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*ती गाजलेली उडी*

 

उभ्या गोऱ्यांना थरकापाने, भरली हो हुडहुडी

वीर सावरकरांची त्रिखंडी,ती गाजलेली उडी..।।धृ।।

 

ऐसा‌ पाहुनी देशभक्त तो, गहिवरला सागर

हेलावुनिया शांत जाहला ,मनी त्याच्याही आदर

लीलया मारली करून अवघ्या, देहाची त्या जुडी

वीर सावरकरांची त्रिखंडी, ती गाजलेली उडी..।।१।।

 

मार्सेलिस किनारा तो गाठू, होता मनी विश्वास

जणू मृत्यनेही धरला होता ,रोखुनी त्याचा श्वास

अचंबित निश्चल होऊनी ,पहात होती हर घडी

वीर सावरकरांची त्रिखंडी ,ती गाजलेली उडी ….।।२।।

 

जगभरात घेतली दखल या ,असीम साहसाची

आंतरराष्ट्रीय न्यायालयीन ,चर्चा झाली धाडसाची

अंदमान गदगदला कैसी, सोसे शिक्षा ती कुडी

वीर सावरकरांची त्रिखंडी ,ती गाजलेली उडी….।।३।।

 

कसे विसरतील भारतीय‌ ,या महान राष्टवीरा

जयघोष करू लीन होऊनी, वंदन‌ क्रांतिवीरा

जाज्वल्य देशाभिमानाने केली ,साऱ्यावरती कडी

वीर सावरकरांची त्रिखंडी ,ती गाजलेली उडी …।।४।।

 

 

©️®️डॉ.सौ. मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा