You are currently viewing पापणीचा काठ ओला

पापणीचा काठ ओला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम मुक्त काव्यरचना*

 

*पापणीचा काठ ओला* 

 

ओलावलेत कितीदा

पापणीचे काठ..

हिशोब त्याचा ठेवलाच नाही..

मुलगी म्हणून…मागे राहून..

दाराआडूनच…

जग बघत राहिले मी….

 

सगळं असूनही…

नसल्यागत उसनीच का राहिले

दोन्हीकडे स्वतःचे

घर कधी ना मिळाले….

 

सून पत्नी मुलगी नाते

मिरवत असताना

मी कोण ,काय कुठे…

हा विचारही का कधी

शिवलाच नाही मनाला….

 

तेव्हाही ओले झाले

पापणीचे काठ…

इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता…

माझ्या ईच्छा आकांक्षा…

मनाच्या तळघरात डांबताना..

ओलावलेच पापणकाठ….

 

जगले तसेच आयुष्य….

सराव झाला तोही….

पापणकाठ पुसता पुसता..

बुडले आठव डोही…..।।

 

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा