You are currently viewing श्रद्धा कदम यांची ‘एमडीआरटी’ पुरस्काराची हॅट्रिक..!

श्रद्धा कदम यांची ‘एमडीआरटी’ पुरस्काराची हॅट्रिक..!

कणकवली

कणकवली शाखेच्या विमा प्रतिनिधी श्रद्धा श्रीकृष्ण कदम यांनी विमा क्षेत्रातील सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार ‘एमडीआरटी’ सलग तिसऱ्या वर्षी प्राप्त करून हॅट्रिक केली आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शाखा व्यवस्थापक बोवलेकर, विकास अधिकारी श्रीनिवास पळसुले यांच्या हस्ते सौ. कदम यांचा कणकवली शाखेतर्फे सत्कार करण्यात आला.

सौ. कदम या गेली २४ वर्ष विमा क्षेत्रात व्यवसाय करत असून गेली नऊ वर्षे सलग चेअरमन क्लब मेंबर आहेत. त्यांनी आजवर विमा क्षेत्रातील अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. विनम्र आणि प्रामाणिक सेवेमुळे कोरोना महामारीतही सर्वोच्च पुरस्काराची हॅट्रिक करणे त्यांना शक्‍य झाले.

आपल्या विमाधारकांचे सहकार्य, आपली प्रामाणिक सेवा, शाखेतील सहा. प्रशासकीय अधिकारी सुनील भोगले, बाळ राणे, सुनील राऊत तसेच शाखेतील अन्य कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. प्रामाणिक सेवा,कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळे आपण हे यश संपादित करू शकल्याची प्रतिक्रिया सौ. कदम यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा