You are currently viewing ⛳पावसाळ्याच्या सुरुवातीची मनोहर गडाची दुर्गभ्रमंती⛳

⛳पावसाळ्याच्या सुरुवातीची मनोहर गडाची दुर्गभ्रमंती⛳

*⛳पावसाळ्याच्या सुरुवातीची मनोहर गडाची दुर्गभ्रमंती⛳*

यावर्षी मे मध्ये उन्हाळ्यात मनोहर गडाची भ्रमंती करण्याचा मानस होता परंतु ते शक्य काही झाले नाही. त्यामुळे यावेळी मनोहर गडावर जाण्यासाठी जून उजाडला. गेल्या दोनवर्षात शिरशिंगे गोठवेवाडी मार्गे जाता आले नाही म्हणून यावेळी त्याच मार्गे जाण्याचे ठरले माझ्यासोबत होता रोहन राऊळ. सकाळी शिवापूरातून गोठवेवाडीमार्गे गडावर जाणाऱ्या मार्गावर पोहचलो सकाळी थोडा पाऊस लागून गेल्याने खाली डोंगरातून वर ढग येत असल्याचे भासत होते. गड चढाई करताना खाली दिसणारे सौंदर्य बघून छायाचित्रे काढण्याचा मोह कोणालाही आवरणार नाही. खूप फोटो व व्हिडीओ याठिकाणी आम्ही काढले.

पहिला चढाव संपवून आम्ही दोन वर्षापूर्वी दुर्ग मावळा प्रतिष्ठान च्या मार्फत लावलेल्या बाकांपाशी काहीशी विश्रांती घेऊन पुढे निघालो. त्यानंतर अजून एका ठिकाणी लावलेल्या बाकापाशी थांबलो. शेवटी बाजार आंबा याठिकाणी पोहचलो. इथे शिवापूर व शिरशिंगे मार्गे येणाऱ्या वाटा एकत्र येतात. याच्या जवळच गेल्यावर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठानमार्फत गडाचा नकाशा, माहिती, सुचना व इतिहास असणारा मार्गदर्शक फलक लावलेला आहे. हा फलक नवीन येणाऱ्या दुर्ग प्रेमींना नक्की उपयोगी पडणारा आहे. या जवळ अजून एक बाक लावलेला आहे तिथे पाच मिनिटांची विश्रांती घेऊन गडाच्या पहिल्या बुरुजापाशी पोहचलो. या बुरुजाच्या पायऱ्यांची इंग्रजांनी मोडतोड केली होती. जरा वर चढल्यानंतर आपल्याला सुस्थितीतील पायऱ्या लागतात. याठिकाणी जुना दरवाज्य असण्याची शक्यता आहे. पायऱ्या चढत आपण गडावर पोहचतो. गडावर पोहचताना उजव्या बाजूस उध्वस्त अर्धगोलाकार बुरुज दिसतो या ठिकाणी पूर्वाभिमुख दरवाजा असण्याची शक्यता आहे. दरवाजाचे दगड आपल्या याठिकाणी दिसतात.

यावेळी आम्ही आधी गडाच्या उत्तरेस उजव्या बाजूस गड भ्रमंती करावयास निघालो. काही दिवस पाऊस पडून गेल्यामुळे गडाने हिरवी चादर लपेटून घेतली होती. तटबंदी वरून चालत जाताना तटबंदीमध्ये आपल्याला एक छोटे शौचकूप लागते. ते पाहून एक भक्कम तटबंदी लागते त्यापुढे आपण गडाच्या उत्तर टोकाला पोहचतो उजव्याबाजूस आपल्याला शिवापूर गाव दिसते. डाव्या बाजूस दूरवर रांगण्या गडाचा सोंडे बुरुजाचा भाग दिसतो. या ठिकाणी खाली वाकून बघितल्यास आपल्याला एक भुयार दिसते. तो चोर मार्ग असावा का ? याठिकाणी खाली उतरण्याचे नियोजन गेली दोन वर्षे आम्ही करत आहोत परतू अजून काही शक्य झालेले नाही.

मागे फिरून आम्ही पुन्हा बुरुजाकडे आलो. डाव्या बाजूला असलेल्या तटबंदीवर चढून फेरफटका मारल्यास आपल्याला संपूर्ण गडाचे दर्शन होते. खाली उतरून तटबंदीमार्गे दक्षिणेकडे जाताना आपल्याला तटबंदीमध्ये दुसरे शौचकूप दिसते. आत उजव्या बाजूने हे शौचकूप उघडते. आत बाहेरून उजेड येण्यासाठी झरोका आहे तसेच रात्रीच्यावेळी दिवे ठेवण्यासाठी जागा आहे. यात हल्लीच्या काळात काही टाइल्स ठेवण्यात आलेले आहेत. जवळच हल्ली बांधलेला संडास आपल्याला दिसतो. उजव्याबाजूस आपल्याला नैसर्गिक पाण्याचा प्रवाह दिसतो. तटबंदीमध्ये हा प्रवाह जाण्यासाठी जागा ठेवलेली आहे. हे नैसर्गिक पाणी अडविण्यासाठी बांध घातलेला आपल्याला दिसतो, गाळामुळे सदर बांध आतून भरून गेलेला आहे. दिवाळीपर्यंत हा प्रवाह सुरु असतो. तटबंदीमध्ये तिसरा शौचकूप आपल्याला दिसतो. हा शौचकूप डाव्या बाजूला L आकारात उघडतो. अजून जरा पुढे गेल्यास छोट्या आकाराचे डाव्या बाजूला उघडणारे शौचकूप लागते. दक्षिणेकडील बाजूस आल्यावर आपल्याला शिरशिंगे गाव खाली दिसते. इथून आपल्याला नारायणगड व महादेवगड दिसतो.

पश्चिम दिशेकडे वळताना आपल्याला विहीर लागते. गेल्या चार वर्षापासून याठिकाणी दुर्ग मावळा प्रतिष्ठानने लावलेली व संवर्धन केलेली कदंब झाडे दिसतात. ही झाडे बघितली की वेगळेच समाधान मनाला लाभते. इथून पश्चिमेकडे जाताना काही ज्योत्या आपल्याला लागतात. समोर दिसणाऱ्या औदुंबराच्या झाडाच्या खाली काही देवतांच्या मुर्त्या दिसतात. मंदिर कोसळल्याने या मुर्त्या इथे ठेवलेल्या आहेत. यात गजांतलक्ष्मी, दोन भैरव व देवीची अशा चार मुर्त्या आहेत. इथेही विश्रांतीसाठी दुर्ग मावळाने बाक बसवलेला आहे. या बाकाचे माझ्यासाठी वैशिष्ट म्हणजे या बकाचे सौजन्य आमच्या न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरुरच्या सन २००४ च्या बॅच ने केलेले आहे. याच्या बाजूलाच जमिनीमध्ये अर्धगोलाकार बांधकाम दिसते. इथे नक्की काय होतं लक्षात येतं नाही. संशोधन गरजेचे आहे.
जरा पूर्वेकडे गेल्यावर आपल्याला एक इमारत दिसते. याच्या दिंडी दरवाजातून आपण आतमध्ये जातो तर पूर्वेकडील दरवाजाने बाहेर पडतो. लगेच उजव्याबाजूला आपल्याला छोटी खोली दिसते. काहीजण या इमारतीला राजवाडा म्हणतात तर काहीजण धान्यकोठार.
पुन्हा मागे औदुंबरच्या झाडाकडे येऊन पश्चिमकडे सरळ चालत गेल्यास मनोहर गडाच्या पश्चिमटोकाकडे पोहचतो. येथून मनसंतोष गड आपल्याला दिसतो. दोन्ही गडाच्या मध्येच खोल दरी आहे. पावसाचा मोसम असल्याने धुक्यात अधून मधून मनसंतोष गड अदृश्य होत होता, हे बघायला खूप नयनरम्य वाटतं होतं. याठिकाणी काही फोटो घेतल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. या पूर्ण भ्रमंतीमध्ये अधून मधून येणाऱ्या धुक्यामुळे खूप अल्हादायक वाटतं होतं. या गडाचा इतिहास यापूर्वीच मी माझ्या फेसबुक टाईमलाईन ला टाकलेला असल्याने त्याची पुनरावृत्ती करत नाही.
मनोहर गड पाहायचा असल्यास एकदातरी पावसात पाहून नक्की या. पावसाळ्यानंतर गडावर खूप गवत वाढते त्यामुळे सर्व गड आपल्याला पाहता येत नाही. यावेळी गवत नसल्याने संपूर्ण गडफेरी करता आली. पायथ्यापासून संपूर्ण गडफेरी सहा किलोमीटरची होते. शिरशिंगे मार्गे पावसाळ्यात शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा मनोहर गड एकदा नक्की पाहून या !

आपला
गणेश नाईक
दुर्ग मावळा परिवार
९८६०२५२८२५
९४२२२६३८०२

*संवाद मिडिया*

*अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव अकॅडमी – महेंद्रा अकॅडमी*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) विशेष बॅच -2024*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2024*

*3.🔰 सरळ सेवा भरती स्पेशल बॅच -2024*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा **-
🪀7350219093
📞📞9022686944

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135355/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा