You are currently viewing आंबोली येथे संरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान…

आंबोली येथे संरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान…

आंबोली येथे संरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान…

सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही…

आंबोली

येथील राघवेश्वर मठ परिसरात बांधकामाची संरक्षक भिंत कोसळल्याने शिरूर येथील एका भाविकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. ही घटना रात्री ९ वाजता घडली. दर शनिवारी प.पू.भारतदास महाराजांच्या मठात धार्मिक कार्यक्रम व पूजा असते. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येतात असतात. आज झालेल्या मुसळधार पावसात ही भिंत कोसळली. त्या ठिकाणी राम मंदिर जीर्णोद्धार आणि सभामंडपाचे काम सुरु आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा