You are currently viewing ओसरगाव टोलनाक्‍यावर उभ्या असलेल्‍या ट्रकमधून कुलर चोरीस…

ओसरगाव टोलनाक्‍यावर उभ्या असलेल्‍या ट्रकमधून कुलर चोरीस…

ओसरगाव टोलनाक्‍यावर उभ्या असलेल्‍या ट्रकमधून कुलर चोरीस…

कणकवली

ओसरगाव टोलनाक्‍यावर उभ्या असलेल्‍या ट्रकमधून १५ हजार रूपये किंमतीचा कुलर चोरीला गेला आहे. याबाबतची फिर्याद ट्रक चालकाने आज पोलिसांत दिली. ६ जून रोजी रात्री ११ ते सकाळी सात या दरम्‍यान ही घटना घडली आहे. चालक बुधाजी भगवान नागोरे (वय ३८, रा.बीड) याने गोवा ते मुंबई या प्रवासादरम्‍यान ६ जून रोजी रात्री दहा वाजता ओसरगाव टोल नाक्‍यावर आपल्‍या ताब्‍यातील ट्रक (एमएच २३ अेयु ५७२७) मुक्‍कामासाठी थांबवला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता तो मुंबईच्या दिशेने गेला. नांदगाव तिठा येथे आल्‍यानंतर त्‍याने ट्रक थांबवून हौद्यामधील साहित्‍याची माेजणी केली. यावेळी एपीबी कंपनीचा कुलर तेथे नसल्‍याची बाब दिसून आली. त्‍यानंतर ट्रक चालक बुधाजी नागोरे याने ६ जून रोजी रात्री ११ ते सकाळी ७ या वेळेत पंधरा हजार रूपये किंमतीचा कुलर चोरीला गेल्‍याची फिर्याद नोंदवली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा