You are currently viewing भाजप चे कमळ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात फुलवण्यात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाचा मोठा वाटा

भाजप चे कमळ रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात फुलवण्यात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाचा मोठा वाटा

भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर

 

राणेंना किनारपट्टी भागात तब्बल १०७३६ एवढे मताधिक्य*

मालवण :

 

लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात महायुतीचे उमेदवार श्री.नारायण राणे यांनी आपले प्रतिस्पर्धी श्री.विनायक राऊन यांच्यावर ४७८५८ मतांनी विजय मिळविला.श्री.नारायण राणे यांच्या या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने मोठा वाटा उचलला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ किलोमीटरच्या किनारपट्टीवर देवगड(नगर पंचायत)व, मालवण, वेंगुर्ला अश्या दोन नगरपालिका असून ३५ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ३८ गावामध्ये श्री.नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०६ मतदान केंद्रे (बूथ) असून यापैकी ९४ मतदान केंद्रावर श्री.नारायण राणे आघाडीवर आहेत. एकंदर मतदानापैकी श्री.नारायण राणे यांना २९,२७५ तर पराभूत उमेदवार श्री.विनायक राऊत यांना १८५३९ मते पडली म्हणजेच महायुतीचे उमेद्वार खा.नारायण राणे यांना सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात तब्बल १०७३६ एवढे मताधिक्य मिळाले. श्री नारायण राणे यांच्या रूपाने रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कमळ फुलले आहेत यामध्ये सिंधुदु्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय याचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल सर्व किनारपट्टीवरील मतदारांचे भाजपा मच्छीमार सेल तर्फे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.

किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते .श्री नारायण राणे यांच्या रूपाने अनुभवी आणि सक्षम खासदार संसदेत गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे. तसेच मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल अशी आशा श्री. भाजपच्या मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा