You are currently viewing बांदा-दाणोली मार्गावर कॅन्टर व चेस डंपर यांच्यात भीषण अपघात…

बांदा-दाणोली मार्गावर कॅन्टर व चेस डंपर यांच्यात भीषण अपघात…

बांदा-दाणोली मार्गावर कॅन्टर व चेस डंपर यांच्यात भीषण अपघात…

माल वाहक ट्रकचा चालक किरकोळ जखमी:दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान…

बांदा

बांदा-दाणोली मार्गावर वाफोली डोंगरीकर हॉटेल जवळ कॅन्टर व चेस (डंपर) यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. धडकेत दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये माल वाहक ट्रकचा चालक किरकोळ जखमी झाला. त्याला बांदा प्राथमिक उपकेद्रांत उपचार करुन घरी पाठविण्यात आल्याचे वैद्यकिय अधिकारी डॉ. गजानन सारंग यांनी सांगितले. हा अपघात शनिवारी पहाटे झाला. याबाबत सायंकाळी उशिरा बांदा पोलिसांत अपघातीची नोंद करण्याची प्रकिया सुरु होती.
या मार्गावर दोन्ही बाजूस झाडेझुडपे वाढलेली आहेत. वळणावर समोरुन येणारे वाहन चालकाला दिसत नाही. सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. हा अपघात पुर्णत: बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे घडला असल्याचा आरोप विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी केला आहे.
बांदा दाणोली मार्गावर अपघाताचे सत्र सुरुच आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. दाणोली, सातोळी-बाळवाट, सरमळे, विलवडे, वाफोली, बांदा ही गावे येतात. कोल्हापुर, पुणे, बेळगाव, गोव्यात जाणारे पर्यटक याच मार्गाचा वापर करतात. या मार्गावर उतार व वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने बरेच अपघात झाले आहेत. या मार्गावर दिशादर्शक व वेग मर्यादा फलक लावणे गरजेचे आहे. काही ठिकाणी रस्ता अरुंद व वळणावळणाचा आहे. संबधित विभागाने रस्त्याचा सर्वे करणे गरजेचे आहे. यापुढे जिवितहानी, नुकसान झाल्यास संबधित विभाग जबाबदार राहील. संबधित विभागाने गणेश चतुर्थी पुर्वी दखल न घेतल्यास माजी पंचायत समिती सदस्य संदिप गावडे यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी बांधकाम विभाग कार्यालयत धडक देणार असा ईशारा विलवडे सरपंच प्रकाश दळवी यांनी दिला आहे.

*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*‌प्रवेश सुरू….प्रवेश सुरू….प्रवेश सुरू…….*

*शिक्षणासोबत नोकरीची हमी* *फक्त*!!!!

*👉दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,*👩‍⚕👩‍⚕

*शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता….(ऍडमिशन) प्रवेश* *सुरु आहे*.
https://sanwadmedia.com/137740/

*दि यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट,* रत्नागिरी येथे १२ वी उत्तीर्ण रत्नागिरीतील विद्यार्थी/ विद्यार्थिनींना प्रवेश घेण्याकरिता सुवर्ण संधी.
खालील अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु.
*▪️B.Sc Nursing*
*▪️Post Basic B.Sc Nursing*
*▪️M.Sc Nursing*
*▪️GNM*
*▪️ANM*

_अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नामांकित हॉस्पिटल मध्ये १००% नोकरीची हमी, तसेच परदेशात सुद्धा काम करण्याची सुवर्ण संधी._

_राज्य सरकारच्या नियमानुसार शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध तसेच मर्यादित विद्यार्थ्यांना खाजगी संस्था कडून शिष्यवृत्ती चा लाभ._

_प्रवेश निश्चित करण्याकरिता खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा._
*📲८६००३०२४५४*
*📲९४२३२९१८६३*
*📲८८३०७८९५७०*

*प्रवेशासाठी अधिक माहितीकरिता खालील लिंक क्लिक करून आपली माहिती सादर करा.*

https://forms.gle/4i3u6hNgVriV7Msr7

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/137740/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा