You are currently viewing जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार..

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार..

जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार..

वेंगुर्ले

भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या यशस्वी कारकीर्दीत पहिल्यांदाच रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात कमळ निशाणीचा खासदार नारायणराव राणे साहेबांच्या रुपाने निवडुन आल्याबद्दल भाजपा वेंगुर्ले च्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रभाकरजी सावंत म्हणाले की , जिल्ह्यातील लोकांनी भाजप ला दिलेला कौल ही भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्तैंनी घेतलेल्या परिश्रमाची पोचपावती आहे. परंतु या विजयाची वेंगुर्ले येथील मुहुर्तमेढ पालकमंत्री रविंद्र चव्हाण साहेब यांनी पाच वर्षांपूर्वी नगरपालिका विजय खेचून आणत रोवली . गेल्या ८ वर्षांत पालकमंत्री चव्हाण साहेब सर्वच निवडणूकीत स्वतः जबाबदारी घेत भाजपाला विजयी करत आले. सन्मा. राणे साहेब यांच्या प्रवेशानंतर सर्वच निवडणूकीत भाजपाला शत प्रतिशत यश मिळत गेले.ग्रामपंचायत निवडणुकीत आपण गेल्या काही वर्षांत मोठे यश मिळवत आलो. सहकारातील सर्व निवडणुका भाजपा एकतर्फी जिंकला.

त्याचा परिणाम म्हणून आपण भाजपाचा या मतदारसंघावर दावा करु शकलो. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांनी ही निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली ज्या मुळे देवेंद्र फडणवीसजी, विनोद तावडे साहेब यांनी पक्षाच्या समोर या मतदारसंघात आपली भाजपाची ताकद पटवून दिली, परिणामी हा मतदारसंघ भाजपाने लढवला हे त्यामागील मुख्य कारण. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांनी प्रचंड मेहनत घेतली, कार्यकर्ते विजयाच्या जोमाने कामाला लागले आणि याच जोरावर ४७ वर्षांनंतर भारतीय जनता पक्षाचा खासदार आपण सर्वांनी निवडून आणला.

बुथ सशक्तीकरण हे वेंगुर्ले तालुक्याने सर्वप्रथम पुर्ण केले याचा परिणाम मतदानातून दिसला. पक्षाने दिलेली सर्व अभियानांतर्गत आपण वेळोवेळी जनतेच्या संपर्कात राहीलो ही वाट विजयाकडे घेऊन जाते, याबद्दल खास वेंगुर्ले तालुक्यांचे जिल्हाध्यक्ष यांनी कौतुक केले. केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेब यांच्या विजयासाठी वेंगुर्ले तालुक्याने अथक परिश्रम घेतले त्या कार्यकर्तेंचे अभिनंदन करतांना, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या विजयाचे सर्व श्रेय पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायणराव राणे,सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली तसेच या तालुक्यातील भारतीय जनता पक्ष संघटना आणि कार्यकर्ते यांना दिले.

जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांनी प्रास्ताविक केले. या सत्कार समारंभात तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल , जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , सोमनाथ टोमके , मच्छिमार सेलचे दादा केळुसकर , सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , मा.उपनगराध्यक्ष दाजी परब , ता.चिटणीस समीर कुडाळकर व जयंत मोंडकर , कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत , मा.सरपंच मनोज उगवेकर , अनु.जाती मोर्चाचे बाबल चव्हाण , भुषण सारंग , कार्यालय प्रमुख छोटु कुबल उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा