सावंतवाडी शहरातील धोकादायक झाडे हटविली…
सामाजिक बांधिलकीची दखल; प्रांताधिकारी व वनविभागाचे मानले आभार…
सावंतवाडी
सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या निवेदनाची दखल घेत प्रांताधिकारी व वनविभागाकडून शहरातील तसेच झाराप हायवे, इन्सुली मेट व मळगाव मेट परिसरातील धोकादायक झाडे तोडण्यात आली आहेत. दरम्यान तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी प्रांताधिकारी व वन विभागाचे आभार मानले. यावेळी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील व रवी जाधव उपस्थित होते. याबाबत २७ मे ला सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले होते.