मालेगावचे नियोजन
—————————
पुस्तक परीक्षण
‘संकल्प’ हा कवी, विचारवंत अरुण पुराणिक यांचा काव्यसंग्रहौङङत वाचावयास घेतला. तेव्हा उतार वयातही अनुभवाने, चिंतनाने प्रगल्भ झालेला प्रज्ञावंत कवी समाजासाठी ज्ञान भांडार खोलून ज्ञानदानाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. याचे खूपच अप्रुप वाटले. जीवन प्रवासात वेगवेगळ्या वळणांवर आपल्या कुटुंबातील सहचरांना गमावल्याचे पहाडाएवढे दु:ख सोसूनही जीवन गाणे गाणारा हा कवी खरोखरच महान आहे. कवी अरुण पुराणिक यांनी जणू जीवन संघर्षाला सामोरे जात जीवन सकारात्मक करत जगण्याचा संकल्प केलेला आहे. हेच ‘संकल्प’ या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. इतर कवींपेक्षा त्यंच्याकविता वेगळ्या चिंतनशील, भावगर्भित, विचार करायला भाग पाडणाऱ्या आहेत.
मुलगा संदीप, मुलगी स्वप्ना आणि पत्नी अनघा यांचे मृत्यू स्वत:च्या डोळ्यांनी पाहणे हा एक नियतीच्या अत्याचारांचा घाव कवी अरुण पुराणिक यांनी आत्मशक्तीने झेलला. त्यातून स्वत:ला सावरुन पुढे वाटचाल सुरु केली. बुध्दीमान माणूस हा विचारशील असेलच असे नाही. परंतु विचारवंत माणूस हा प्रज्ञावान असतोच. त्यांनी साहित्य लेखनाला सुरुवात केली. संकल्प हा काव्यसंग्रह त्यांचे आठवे पुस्तक आहे.
‘आशीष’, ‘गीत माझे’, ‘कवीची कविता ’, ‘ती’, ‘मी आणि तू’, जीवन, नियतीचे फेरे, धागे विणता नात्यांचे’, ‘महामानव’, ‘प्रभू रामचंद्र’, ‘सर्व धर्म समभाव’, ‘भारताचा तिरंगा’, ‘संकल्प’, ‘वसुंधरा राणी’, ‘दाह’, ‘अस’, ‘नाते जपावे आपले’, ‘रंग जीवनाचे’, ‘अपेक्षा’, ‘श्रध्दांजली’ या साऱ्या कविता वाचकांना भावतील अशाच आहेत. कवी अरुण यांच्या जीवनाचे प्रतिबिंब या काव्यात दिसून येईल. त्यांचे सुख-दु:ख, मनन, चिंतन, विचार यातून या कविता जन्मलेल्या आहेत. हे आपणास कविता वाचतांना दिसून येते. अनुभवाचा अस्सल परिपाक असलेले हे जीवनाचे काव्य चिरंतन अंतकरणात दरवळत राहील यात शंका नाही. कवी अरुण पुराणिक यांच्याकडून प्रदीर्घ साहित्य सेवा घडो. त्यांना पुढील साहित्य लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. ‘संकल्प’ काव्यसंग्रहाबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.
– राष्ट्रकवी लेखक व समीक्षक :
संजय मुकूंदराव निकम
गायत्रीनगर, स.नं. १३, प्लॉट नं. ३५ मालेगाव कॅम्प,
ता. मालेगाव, जि. नाशिक, पिन कोड – ४२३२०३
मो. ८६५७४८८४२६
संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू….. प्रवेश सुरू…..*
*गेली 18 वर्षे 100% देशात आणि परदेशात नोकरी व हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचा अनुभव असलेल्या कोकणातील एकमेव महाविद्यालयात करियर करण्याची सुवर्णसंधी*
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी ,मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट , दापोली.*
संलग्न मुंबई विद्यापीठ,मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त
*🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2024-25 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*👉हॉटेल मॅनेजमेंट (B.Sc.Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
*आजच आपला प्रवेश निश्चित करा.*
*📚 वैशिष्टये 📚*
🔹 १०० % प्लेसमेंट.
▪️परदेशात नोकरीच्या संधी.
▪️ ५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪️ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
▪️ अनुभवी अध्यापक वर्ग.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – भगवान महवीर विद्यासंकुल,श्रीफळ वूड्स,प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी*
*📱संपर्क क्रमांक :*
*7057421082*
*9028466701*
*9420156771*
✉️ramraje_r@rediffmail.com
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/138313/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*