You are currently viewing जनतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने मानाचा मुजरा

जनतेचा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या निमीत्ताने वेंगुर्लेत भाजपा च्या वतीने मानाचा मुजरा

वेंगुर्ले :

 

भाजपा वेंगुर्ले च्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या औचित्याने शहरातील माणिकचौक येथील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मानाचा मुजरा करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीयांचे दैवत. राज्य कसे करावे याचा आदर्श. या अव्दितीय राजे श्रीमंत योगींचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आजही ३५० वर्षानंतर रोमांचीत करतो. भारतवासीयांच्या मनाला प्रफुल्लीत करणारा.. सदैव उभारी देणारा.. चैतन्य निर्माण करणारा हा सोहळा आहे.

जिजाऊंचे हिंदवी स्वराज्याचे स्पप्न आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर साकारले. छत्रपती शिवाजी महाराजांचा “निश्चयाचा महामेरु.. बहुत जनासी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु.. श्रीमंतयोगी जाणता राजा” म्हणून गौरव होतो. आमचा संस्कृती धर्म टिकवणारे हे छत्रपती, यामुळेच या दिवसाला ‘हिंदू साम्राज्य दिन’ म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांना शतशः वंदन.. मानाचा मुजरा !!!

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर, सोमनाथ टोमके, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री व सुनिल मठकर, खरेदी विक्री संघ चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, मा.उपनगराध्यक्ष दाजी परब, ता.चिटणीस समीर कुडाळकर व जयंत मोंडकर, कुशेवाडा उपसरपंच निलेश सामंत, मा.सरपंच मनोज उगवेकर, अनु जातीमोर्चाचे बाबल चव्हाण, भुषण सारंग, कार्यालय प्रमुख छोटु कुबल उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा