*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी श्रीनिवास गडकरी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सर अवकाळी*
————————–
अवचित आली सर अवकाळी, भिजून गेली काळी
थंडगार किती सुटलं वारं, तनामनाला जाळी
भणाणणाऱ्या वाऱ्या संगे
येती शहारणाऱ्या सरी.
भास होतसे तुमचा राया
कितीक नाना परी
काम टाकुनी घरास अपुल्या या ना संध्याकाळी.
थंडगार किती सुटलं वारं, तनामनाला जाळी
. घमघमणाऱ्या जुई फुलांचा
हा ,गजरा मी गुंफते
करून सारा शृंगार
तुमची वाट मी पाहते
चंद्रकोर ही तुमच्या नावाची पहा रेखली भाळी
थंडगार किती सुटलं वारं तनामनाला जाळी
सोसाट्याच्या सरी जोडीनं
चला अंगावरती घेऊ
या ना तुम्ही वेगे सखया
दोघं आनंदाने न्हाऊ
घोड्यावरून दौडत येता, तुमची चमचम करेल बाळी
थंडगार किती सुटलं वारं, तनामनाला जाळी
श्रीनिवास गडकरी
रोहा पेणं पुणे
@सर्व हक्क सुरक्षित
9637832203
14.05.2024
केवळ नावासहितच. पुढे. पाठवावे