You are currently viewing . होय मीच पक्षाचा आश्वासक चेहरा”

. होय मीच पक्षाचा आश्वासक चेहरा”

‘… होय मीच पक्षाचा आश्वासक चेहरा”
….. अँड नकुल पार्सेकर, सिंधुदुर्ग…..

भारतीय संसदीय लोकशाहीचा उत्सव पार पडला. देशाची सतरावी लोकसभा बरखास्त होईल आणि मा. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होवून अठराव्या लोकसभेचा प्रवास सुरू होईल. यामध्ये भारतीय मतदारानी जो बदल केलेला आहे तो एवढाच… गेली दहा वर्षे देशात मोदींच सरकार आणि मोदींची गॅरंटी होती.. आता पंतप्रधान मोदीचं असतील आणि सरकार एनडीएचं असेल ज्याचा रिमोट हा प्रामुख्याने चंद्राबाबू व नितीशबाबूच्यां हातात असेल.
या निवडणुकीच्या निकालाने अनेक धक्कादायक निकाल दिले. साऱ्या देशाचे लक्ष असलेल्या महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांच्या राजकीय खेळीचा अपेक्षित परिणाम झाला. मात्र महाराष्ट्रात ठाकरे व पवार यांनी ज्या प्रतिकुल परिस्थितीत हे आव्हान पेललं ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
शरद पवार, देशाच्या राजकीय पटलावर सतत चर्चेत रहाणारा चेहरा. तब्बल साठ वर्षांची संसदीय कारकिर्दी, देशाचे माजी संरक्षणमंत्री, कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे अनेक वर्षे मुख्यमंत्री. १९९९ मध्ये सोनिया गांधीं यांच्याशी राजकीय मतभेद झाल्यामुळे पवारांनी आपला स्वतःचा राष्ट्रवादी हा पक्ष स्थापन करून स्वतंत्र राजकीय प्रवास सुरू केला. अर्थात या पक्षाचा बेस हा प्रामुख्याने महाराष्ट्रच असल्याने सुरूवातीला निवडणुकीत यश मिळाले आणि काँग्रेस व राष्ट्रवादीची विचारधारा एकच असल्याने महाराष्ट्रात सत्तेत सहभागी झाले. देशातील इतर दोन छोट्या राज्यात त्यांचे काही आमदार निवडूनही आले… पवारही स्वतः केंद्रात युपीए एक व युपीए दोनच्या सरकार मध्ये सहभागी झाले.
हे सगळे सुरू असताना राजकीय द्रुष्टीने पवारांनी महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेची धुरा ही आपले पुतणे अजितदादा पवार यांचेकडे दिली. कन्या सुप्रिया सुळे दिल्लीत आणि पुतण्या महाराष्ट्रात अशी सत्तेची विभागणी केली. अजित दादाचं संपूर्ण राजकीय करीअर हे काकांच्या छञछायेमुळेच घडलं जे दादांनी आता
स्वतःच्याच कर्मामुळेच बिघडवलं.वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी कांकाच्या कृपेने दादा देशाच्या संसदेत गेले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि इतर अनेक खात्यांचे मंञी झाले. पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळाली. दादावंर भाजपाने सिंचन व शिखर बँक घोटाळ्याचे आरोप केले. चौकशा सुरू झाल्या. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने यात आपण अडकणारं याची पूर्ण जाणीव दादानां झाली. देशाच्या पंतप्रधानांनी तशी जाहीर धमकी दिली आणि दादांनी महाशक्तीचा आसरा घेऊन बंडखोरी करून भाजपाच्या वळचणीला गेले. चाळीसहून जास्त आमदार, ज्यांना पवारांनी राजकीय द्रुष्टीने बलवान केल असे अनेक नेते वयाच्या ८४ व्या वर्षी ज्या पवारांनी प्रतिकुल परिस्थितीत अनेकांना हात दिला त्या पवारांचा हात सोडून गेले. पवारां बरोबर फक्त होते त्यांचे कुटूंबिय, कन्या खासदार सुप्रिया सुळे, नातू आमदार रोहित पवार, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि इतर दहा बारा आमदार. पवारांबरोबर जनता आहे की नाही हे निवडणूकीत समजणार होते.
लक्षात घ्या तब्बल पंचवीस वर्षे रक्ताचं पाणी करून बांधलेला पक्ष असा घरातीलच घरभेदी विश्वासघात करून आपल्या डोळ्यादेखत हायजॅक करेल असं पवारांना स्वप्नातही वाटलं नसेल. निवडणूक आयोगानेही पक्ष कुणाचा हा निर्णय देताना वस्तुस्थितीचा विचार न करता निर्णय दिला.. पक्ष गेला, चिन्ह गेलं, पवारांच्या जीवावर गडगंज संपत्ती करणारे बहुसंख्य नेते गेले.
वय वर्ष ८४,कर्करोगा सारखा दुर्धर आजार, कुटुंबातील मतभेद चव्हाट्यावर, मुलासारखं प्रेम ज्याला दिल त्या पुतण्याने केलेला विश्वासघात आणि निवडणूक जाहीर होण्यापूर्वी जेमतेम दीड महिन्यापूर्वी मिळाले नवीन पक्ष चिन्ह. स्वकीयांच्या सहकार्याने विरोधी पक्षाकडून होणारे व जीव्हारी लागलेले शाब्दिक हल्ले , अशा अतिशय प्रतिकुल परिस्थितीत हा ८४ वर्षाचा योध्दा लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला. एका बाजूला आघाडीची मोट बांधायची, त्यानां संपवण्यासाठी सातत्याने सुरू असलेल्या महाशक्तीच्या आणि स्वकीयांच्या कारवायांना तोंड द्यायचे हे एक विलक्षण आव्हान होतं. एकवेळ बाहेरचे शञूंशी दोन हात करणे सोपे असते पण घरातल्या शञूंशी लढण मानसिक द्रुष्टीने कठीण असतं. अनुभवाने आणि कर्तुत्वाने जेष्ठ आणि श्रेष्ठ असलेला हा लोकनेता चक्रव्यूहात सापडला होता..
अशावेळी आठवण होते ती महाराष्ट्राच्या २०१९ च्या निवडणुकीची. खरं तर त्यावेळी पवारांच्या राष्ट्रवादीच्या अस्तित्वाचा प्रश्न होता… अशावेळी पवारं पायाला भिंगरी लावून फिरले. साताऱ्यातील धो धो पावसातील त्या व्हायरल झालेल्या सभेने सारं वातावरण बदलून टाकलं आणि पवारांच्या पक्षाचे तब्बल ५४ आमदार निवडून आले.. पण त्यावेळी परिस्थिती यावेळच्या परिस्थिती पेक्षा फारचं वेगळी होती. तेव्हा पक्ष एकसंध होता.
यावेळच्या निवडणूकीत तर या योद्ध्यांने कमालीचं केली. कन्या सुप्रिया सुळे, नातू आमदार रोहित पवार, कुटुंबिय आणि निवडक सहकारी आणि आघाडीतील नेत्यांना घेऊन हा योध्दा लोकसभेच्या निवडणुकीत उतरला. आरोग्याच्या तक्रारी, पंचेचाळीस ते पन्नास हे अंगाची लाही लाही करणारे तापमान , पच्चावन वर्षाहून जास्त काळ ताब्यात असलेल्या आणि जगभरात बहुचर्चित असलेल्या बारामती या मतदारसंघात स्वकीयांच्या मदतीने विरोधकांने दिलेलं तगडं आव्हान हे सगळ असताना पवारांनी अतिशय संयमाने हे आव्हान समर्थपणे पेललं.
मा. पंतप्रधानांनी भटकती आत्मा म्हणून केलेल्या टिकेलाही त्यांनी सहजपणे उत्तर दिलं. पवार म्हणाले, ” ते पंतप्रधान आहेत, काय बोलावं , काय बोलू नये हा त्यांचा अधिकार मात्र या देशातील शेतकरी व सर्व सामान्यांच्या प्रश्र्नासाठी माझा आत्मा अस्वस्थ आहे हे खरं आहे. भाजपाचे जेष्ठ मंञी चंद्रकांत पाटील यांनी “आम्हांला शरद पवारांना संपवायच आहे. यावर खोचक प्रतिक्रिया कन्या सुप्रिया यांनी दिली पण शरद पवार एका शब्दाने रियाक्ट झाले नाहीत. राजकारणात टोकाचा संयम लागतो तो पवारांकडे आहे.
अवघ्या तीन महिन्यात उमेदवार ठरवणे, प्रचार यंञणा राबवणे, सैन्य सोडून गेलं.. सेनापती एकटा पडला.. जयंत पाटील, देशमुख यांच्या सारख्या हाताच्या बोटावर सोबत असलेल्या निष्ठावंताना बरोबर घेऊन हा योध्दा लढत होता.. दहा जागा लढवून आठ जागा जिंकणे हे पवार नावाचा योध्दाचं करू शकतो. काही उमेदवार तर सर्वसामान्यचं आहेत.. त्यापैकी एक लंके. नगरच्या राजकारण तब्बल साठ वर्षे वर्चस्व असलेल्या वि. खे. पाटील यांचे संस्थानला लंके सारख्या एका जनतेशी नाळ असलेल्या लंकेने दिलेले आव्हान ही खरी शरद पवार या योध्दाचीच किमया आहे.
जेव्हा पक्ष फुटला तेव्हा प्रसार माध्यमांतून प्रसारण सुरु होतं.. तेव्हा पवारांचा नातू आमदार रोहित पवार याना त्यांच्या दोन छोट्या मुलांनी प्रश्र्न विचारला.. ” बाबा, तुम्ही कुणाबरोबर आहात… तुमच्या आजोबा बरोबर की कांका सोबत? यावर रोहित म्हणाला, अर्थात सदैव आजोबा सोबत, .. यावर त्या दोन्ही मुलांनी रोहित यांना कडकडून मिठी मारली व म्हणाली. वेल डन, दॅट्स लाईक अ गुड बाबा”… ज्या दोन लहान मुलानां समजल ते ६५ वर्षांच्या अजितदादांना का नाही समजल?
मा. पवारांचा एकसष्टिचा मोठा सोहळा मुंबईत आयोजित केला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न आदरणीय अटलजी़च्या शुभहस्ते पवारांचा सत्कार होता , त्यावेळी संबोधित करताना अटलजी म्हणाले होते, “खरं तर माझा नियोजित परदेश दौरा होता, मी तो प्रमोदजीना रद्द करायला सांगितला, कारण शरदबाबू़च्या या सोहळ्यात मी उपस्थित राहिलो नसतो तर ते शल्य कायम मनात राहिलं असतं. या देशातील सहकार, कृषी, संरक्षण, खेळ, सांस्कृतिक चळवळ आणि आपंती व्यवस्थापन अशा क्षेत्रात प्रभावीपणे काम करणारे शरदबाबू हे अष्टपैलू आहेत. आमचे वैचारिक मतभेद जरुर आहेत पण देशाच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे हे विसरून चालणार नाही. गुजरात मधील भूकंपात त्यानी अहोरात्र केलेलं काम विसरता येणार नाही.
पाच वर्षापूर्वी मा. पंतप्रधान जेव्हा बारामती दौऱ्यावर होते तेव्हा याच भटकत्या आत्म्या बाबत बोलताना म्हणाले होते” देशकें कृषीक्षेञमें पवारसाबकां बढा योगदान है, मैं उनकीं उ़गंली पकडकर राजनितीमे आया, वह मेरे गुरु है|
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत काँग्रेसमध्ये असताना मा. नारायणराव म्हणाले होते… “पवारासारखा नेता पुन्हा महाराष्ट्रात होणे नाही.. ” इ. इ.
सुमारे पाच वर्षापूर्वी एका शरद पवारांच्या एका जाहीर सत्कार सोहळ्यात नितीन गडकरी यांनी केलेल्या भावना व विचार आजच्या निवडणूक निकालाच्या अनुषंगाने तंतोतंत खरे ठरतात.. गडकरी साहेब म्हणाले होते, ” एक सांगतो तुम्ही कुणाचाही नाद करा पण पवारांच्या नादाला लागू नका, एखाद्याचा गेम करायचा असेल, तर पवार आदेश देतात… लागा कामाला… म्हणजे समजायचं गेम झालाचं.शरद पवार हे आपल्या कर्तुत्वाने एवढे मोठे नेते आहेत की महाराष्ट्राच्या भूमीत या वटवृक्षाची पाळंमुळं खोलवर रुजलेली आहेत.. या झाडावरची एखादी जरी फांदी हलली तरी भूकंप होतो”..
या निवडणुकीत शरद पवारांनी मिळवलेलं यश विलक्षण आहे. हे कितीही राजकीय मतभेद असले तरी मान्य करावचं लागेल. स्व. यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवणाऱ्या या योध्द्याने पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक घडी विसकटता नये यासाठी केलेला संघर्ष कौतुकास्पद आहे. खरं सहजपणे मोदी शहा यांच्याशी राजकीय तडजोड करून कन्या सुप्रियाचे राजकीय पुनर्वसन करता आले असते पण तो मार्ग त्यांनी स्विकारला नाही.
पक्ष फुटल्यावर एका पञकाराने पवारानां प्रश्र्न विचारला’ आता तुमच्या पक्षाचा आश्वासक चेहरा कोणता? आपली काॅलर उडवतं पवारांनी अगदी हसत आत्मविश्वासाने उत्तर दिलं… शरद पवार…
मी आतापर्यंत शरद पवारांना एकदाचं भेटलो. काही वर्षापूर्वी सावंतवाडीत कोकण मराठी साहित्य परिषदचे अखिल भारतीय साहित्य संमेलन होत. तेव्हा आम्हाला निधी हवा होता. त्या साहित्य संमेलनाच्या आयोजन समीतीत मी, स्व. जयानंद मठकर, स्व. विद्याधर भागवत, स्व. काशिनाथ वाडेकर असे मिळून अवघ्या दहा मिनिटांची आमची भेट सावंतवाडी पर्णकुटी येथील शासकीय निवासस्थनी प्रवीणभाई भोसले यांनी घडवून आणली होती. तेव्हा पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ही एक भेट सोडली तर पवार साहेबांना भेटण्याचा योग कधी आला नाही..
पवार साहेब, आपले मनापासून अभिनंदन….

*संवाद मिडिया*

🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂👩‍⚖️🧑‍⚖️🤵‍♀🤵‍♂

*प्रवेश सुरू.. प्रवेश.. सुरू… प्रवेश सुरु! 2024-2025*

*१०वी – १२वी नंतर इंजिनिअरिंग व फार्मसी अभ्यासक्रमांना प्रवेश सुरु..!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नं.१ एज्युकेशनल कॅम्पस
*भोसले नॉलेज सिटी* येथे

*👉१०वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️सिव्हील इंजिनिअरिंग
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

https://sanwadmedia.com/138036/
*👉१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु..!*
▪️मेकॅनिकल इंजिनिअरिंग
▪️इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
▪️कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग

*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी*

मुंबई विद्यापीठ संलग्न व एनबीए मानांकित अभियांत्रिकी महाविद्यालय
www.ybit.in.co

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲9404272566*
*डिग्री :*
*📲 9604272566*

*👉१२ वी नंतर डिग्री/डिप्लोमा फार्मसीला प्रवेश सुरु!*
▪️डी.फार्म
▪️बी.फार्म
▪️एम.फार्म

*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*
मुंबई विद्यापीठ संलग्न व नॅक मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव फार्मसी कॉलेज
www.sybespharmacy.com

*प्रवेशासाठी संपर्क :*
*डिप्लोमा :*
*📲8600380717*
*डिग्री:*
*📲8275651704*

*भोसले नॉलेज सिटी*
*चराठे, सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग*
www.bkcedu.com
*Advt Web link*
https://sanwadmedia.com/138036/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा