You are currently viewing काव्यपुष्प- ८१ वे

काव्यपुष्प- ८१ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरूण वि. देशपांडे लिखित श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली*

 

*काव्यपुष्प- ८१ वे*

******

भगवंत नाम घेण्याची ईच्छा व्हावी । मनास गोडी लागावी ।

निष्ठा असावी । भगवंत चरणी ।।१ ।।

 

रामनामाचे महत्व सांगती । रामनाम घेण्या लावीती ।

करा ध्यान , करा चिंतन । सांगणे श्री महाराजांचे ।। २ ।।

 

नामात मोठे सामर्थ्य आहे । जो नाम घेउनी पाहे ।

भगवंत पाठीशी आहे । येईल प्रचिती त्याला ।। ३ ।।

 

नाम घेई भगवंताचे । नाही काम त्याचे अडायचे । अनुसंधान नामाचे । लाज त्याची राखील ।। ४ ।।

 

जो आज्ञेचे पालन करतो ।अहंकार त्याला सोडतो ।

सद्गुरू एक योग्य तो । आज्ञा करण्यास ।। ५ ।।

 

रामनामाची गरज आहे । हेची लवकर कळत नोहे ।

भोग भोगणे भाग आहे । कळे हे अखेर ।। ६ ।।

 

चित्त नामात गुंतवावे । प्रसंगास सामोरे जावे । भगवंत इच्छेस मानावे । सांगणे हे श्री महाराजांचे ।। ७ ।।

—————————————–

क्रमशः करी लेखन हे कवी अरुणदास ।।

—————————————–

श्रीगोंदवलेकर महाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-८१ वे

-अरुण वि.देशपांडे-पुणे

—————— ———————-

प्रतिक्रिया व्यक्त करा