You are currently viewing आसोली येथील सुरंगी कळ्या, फुलांना वाशी मार्केट

आसोली येथील सुरंगी कळ्या, फुलांना वाशी मार्केट

*आसोली येथील सुरंगी कळ्या, फुलांना वाशी मार्केट*

*चार टन कळ्या, फुलं रवाना*

*अर्चना घारेंनी दिला महिला बचत गटांना दिलासा*

वेंगुर्ला :

तालुक्यातील आसोली गावातातील महिलांच्या झेप प्रभाग संघच्या सुरंगीची फुले आणि कळ्यांना सौ.‌ अर्चना घारे परब यांनी विशेष प्रयत्न करत राज्यातील महत्वाची वाशी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. बुधवारी पहिली गाडी नारळ वाढवून सौ. घारे यांच्या उपस्थितीत वाशीसाठी रवाना झाली.

सुरंगीच फुल व कळ्या या एकत्र करून सुमारे चार टन माल असणारी पहिली गाडी वाशी बाजारपेठेला रवाना झाली. येथील महिला भगिनींना रोजगार मिळावा, शेतमालाला योग्य भाव मिळावा या हेतूने अर्चना घारे यांनी परिश्रम घेतले. याबद्दल महिलांच्या संघाकडून त्यांचे धन्यवाद मानले.

सौ. अर्चना घारे म्हणाल्या, प्रभाग संघाच्या सचिव सौ. रिया धुरी यांनी माझ्याकडे पाठपुरावा केल्यामुळे शेतमालाला वाशीसारखी बाजारपेठ उपलब्ध करून देता आली. वाशीमध्ये हा माल थेट जाणार आहे. आज एक गाडी जात असली तरी भविष्यात शेकडो गाड्या येथून वाशीला जातील. माझ्या महिला भगिनी सधन व्हाव्यात हा उद्देश आहे. महिला भगिनींसाठी योगदान देता आले याचे समाधान आहे. शेतमालाला दलालाविना बाजारपेठ उपलब्ध होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगला नफा मिळेल. याचा आनंद आहे. अशा भावना त्यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या.

यावेळी महिला संघाच्या सचिव रिया धुरी, राष्ट्रवादीचे आसोली गाव अध्यक्ष विक्रांत कांबळी, विधानसभा महिला अध्यक्षा नितेशा नाईक, युवा अध्यक्ष विवेक गवस, विद्यार्थी अध्यक्ष ऋतिक परब आदीसह आसोली ग्रामस्थ उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*अधिकारी घडवणारी कोकणातील एकमेव अकॅडमी – महेंद्रा अकॅडमी*

*🔰⚜️आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस🔰⚜️👇🏻*

*1. 🔰राज्यसेवा , संयुक्त परीक्षा गट – ब ( PSI /STI/ASO) CDPO( महिला व बालविकास अधिकारी) विशेष बॅच -2024*

*2.🔰पोलीस भरती स्पेशल बॅच – 2024*

*3.🔰 सरळ सेवा भरती स्पेशल बॅच -2024*

🎉🎊🎊 *( नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे)🎉🎊🎊*

*🔰आमच्या अकॅडमीची वैशिष्ट्ये🔰*-:
📌अनुभवी शिक्षकवर्ग.
📌सुसज्ज वाचनालय.📚📚
📌अभ्यासाला पुरक आणि शांत वातावरण.
🏠निट व स्वच्छ वर्ग.
📌पिण्याचा पाण्याची सोय.
📌वाचनालयामध्ये प्रवेश घेण्याअगोदर वाचनालय बघायची संधी.
📌आकर्षक व उपयोगी पुस्तके वाचनालयामध्ये उपलब्ध.
📌अनोखी शिकवण्याची पद्धत.
📌आमच्या अकॅडमीला एकदा भेट द्या आणि आपल्याला पडलेल्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा. *मित्रहो” महेंद्रा अकॅडमी ही आपल्या जिल्ह्यातील तरुणांमध्ये असलेली उदात्त बुद्धिमत्ता तसेच आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये अभ्यास करण्याची असलेली क्षमता ही संपूर्ण जगाला दाखवून देण्यासाठी चालू केलेली विशेष चळवळ आहे.आपल्या बहुमूल्य वेळेपैकी थोडा वेळ आमच्यासाठी काढा आणि आमच्या अकॅडमीला एकदा नक्की भेट द्या.*
*अधिक माहितीसाठी संपर्क करा **-
🪀7350219093
📞📞9022686944

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/135355/
———————————————-
*संवाद मीडिया*
वेबसाईट : https://sanwadmedia.com/
फेसबुक : https://facebook.com/Snvadmedia
चॅनेल :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा